संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशातून आणि देशाबाहेरील सेलिब्रिटी, खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला असताना भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकर याने शेतकऱ्यांविराधात ट्विट केल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टिका होत आहे.

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी आक्रमक होत सचिनचा भारतरत्न काढून घेण्याची मागणी केली आहे. सचिन सहा महिने झोपला होता, कधीही संसदेत उपस्थित राहून त्याने एकही प्रश्न विचारला नाही आणि आता तो शेतकऱ्यांविरोधात बोलत आहे. भारतात संघाच्या लोकांची चापलुसी करायची आणि भारतरत्न सारखे पुरस्कार मिळवायचे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. मुलाला यापुढे भारतीय संघात खेळण्यासाठी सचिन प्रयत्न करेल. त्यामुळे खरी मेहनत करणारी मुले मागे राहतील. असं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांविरोधात सचिनचं ट्विट 

“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया’’. असं ट्विट सचिन तेंडूलकरने केले होते.

म्हत्तवाच्या बातम्या-
४५ गुन्हे दाखल, ४० वेळा जेल तरीपण चोरी करायच्या नवीन पद्धती शोधतो ‘कालिया’
रिहानाचा आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ
मराठमोळा दिग्दर्शक सचिनवर भडकला; ‘माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण…..’
धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटा आक्रमक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.