संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही…’

मुंबई | जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केले.

त्यानंतर मध्यमांशी बोलताना पडळकर यांनी जहरी शब्दात शरद पवार यांच्यावर टीका केली. पवारांवर करण्यात आलेल्या टीकेवर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ‘शरद पवार हे देशाचे पुरोगामी नेते आहेत. त्यांचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे आता पडळकरांना आम्ही सोडणार नाही,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेडचा विचार हा समाजातील तेढ कमी करुन त्यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा आहे. जेजुरी गड हे सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहे. जेजुरी गडाला असणारे ऐतिहासिक महत्व पाहता त्याठिकाणी आजपर्यंत शहाजीराजे – छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीविर उमाजी नाईक या महापुरुषांची स्मारके उभी करण्यात आली. मात्र ज्या अहिल्यामाईंनी जेजुरी गडाचा जीर्णोद्धार केला त्यांचेच स्मारक जेजुरी गडावर नसणे ही अनेकांची खंत होती.’

शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले होते पडळकर?
या उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचे पडळकर यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचेही यावेळी बोलताना पडळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी
‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.