हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे; संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई | ‘’या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझ व्यक्तिगत मत नसून राष्ट्रीय मत आहे’’  असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी ठणकावले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सांगलीच्या स्टेशन चौकातील कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी ते शिवसेनेबद्दल भरभरुन बोलले आहेत.

दरम्यान, ‘’चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आज हे नामकरण होतं असलं तरी खरं नामकरण ते आहे, जेव्हा गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा होतील. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे लक्षात ठेऊन काम करुया.  हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकत असं माझ स्वत: चं मत आहे’’.

तसेच भिडे पुढे म्हणाले, ‘’प्राणीमात्रांना जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तितकेच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल. भारत म्हणून नाही. तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन कामावर तुटून पडूया’’.

‘’एका चौकाचं नाव काय संपूर्ण देशाच नाव या नावानं ओळखला गेलं पाहिजे. इतकी महत्वाची आहे शिवसेना’’.  अस मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शौचालयात जाताना मोबाईल घेऊन जाताय; आताच सोडा ही सवय नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला
शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.