‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’

मुंबई | ‘या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझ व्यक्तिगत मत नसून राष्ट्रीय मत आहे,’ असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हंटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सांगलीच्या स्टेशन चौकातील कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी ते बोलले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘नोटेवरील महात्मा गांधींचा फोटो बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे. आता भिडे यांच्या या मागणीवर राजकीय वर्तुळात नेमके कसे पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना भिडे म्हणाले, ‘प्राणीमात्रांना जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तितकेच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल. भारत म्हणून नाही. तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन कामावर तुटून पडूया.’

महत्त्वाच्या बातम्या
….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’
शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…
कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; घ्या जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.