“दारूची दुकाने उघडी, पण कोणी काही विकत बसलं तर त्याला काठ्या, काय चावटपणा चालला आहे”

 

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैनान घातले आहे, राज्यात दिवसाला हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहे असे असताना अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे.

अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोना हा रोग नसून त्याने मरणाऱ्या माणसांची जगण्याची लायकी नाही, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

मूळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाही. कोरोना हा रोग नाही, हा ** वृत्तीच्या लोकांना होणार रोग आहे. मानसिक रोग आहे, यामुळे काहीही होत नाही असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

तसेच संभाजी भिडे यांनी राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांवर आक्षेप घेतला आहे. दारूची दुकाने उघडी, पण रस्त्यावर कोणी काही विकत बसल्यावर त्याला काठ्या मारतात, काय चावटपणा चालला आहे, हा नालायकपणा, मुर्खपणा आहे.

तसेच लोकांनी या विरोधात बंड केले पाहिजे, हे शासन उचलून फेकून लावले पाहिजे. कोरोना पळवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.