वादात अडकलेल्या शाहरुख खानसोबत काम करण्यास अभिनेत्री समंथाचा स्पष्ट शब्दात नकार

शाहरुख खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन खूपच चर्चेत आहे. त्याचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रगच्या प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये आहे. शाहरुखच्या लाख प्रयत्नानंतरही त्याला मुलाचा जामीन मंजूर होताना दिसत नाही आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर 20 ऑक्टोबर म्हणजेच आज सुनावणी होणार आहे.

आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुख खानने त्याच्या सर्व आगामी चित्रपटांचे शूटिंग थांबवले आहे. यादरम्यान, साऊथ दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘लायन’ चित्रपटाची सध्या सिनेसृष्टीत बरीच चर्चा रंगली आहे.

शाहरुखसोबत साऊथ दिग्दर्शक एटलीच्या लायन चित्रपटात काम करण्यासाठी समंथा प्रभू विचारण्यात आले होते, पण तिने किंग खानसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला. समंथाकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. ती त्याच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

यामुळेच तिने लायन चित्रपटासाठी नकार दिला आहे. मात्र याबाबत अद्याप दोघांकडून कोणतीच माहिती समोर आली नाही. समंथाचा नुकताच नागा चैतन्य सोबत घटस्फोट झाला असून ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे.

नुकतीच समंथा प्रभूने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलगू दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच सामंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा चर्चा चालू होत्या. मात्र, ती कोणत्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे याची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

“द फॅमिली मॅन 2” या वेब सिरीजमधील समंथाने केलेली भूमिका सर्वांनाच आवडली होती. शाहरूख खान स्पेनमध्ये त्याच्या पठाण नावाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुखने शुटींग रद्द करून पुढे ढकलली. ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेन दौऱ्यावर होता.

शाहरुख खान स्पेनला जाऊन ‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोणसोबत एक खास गाणे शूट करणार होता. आर्यनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक कलाकार शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले आहेत. तसेच आर्यनच्या समर्थनार्थ शाहरुख खानच्या चाहत्यांनी मन्नत बाहेर देखील गर्दी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या
आर्यनला जेलमधील जेवन पचेना; अधिकाऱ्यांना सतावतेय आर्यनच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता
वृद्ध व्यक्तीसोबत रस्त्यावरच बसला मराठमोळा IAS अधिकारी; लोकं म्हणाले एवढा साधेपणा पाहीला नाही..
बोअर खोदताना पाण्याऐवजी बाहेर पडल्या आगीच्या ज्वाला! मशीनही जळून खाक; जाणून घ्या पुर्ण घटना..
८० वर्षांच्या अमिताभने तिशीतल्या क्रितीसोबत केला बॉलरुम डान्स; म्हणाले, कॉलेजचे दिवस आठवले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.