संमथा – नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा; स्वत: संमथानेच ‘ह्या’ कृतीने सत्य समोर आणले

साऊथ इंड्रस्ट्रीचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांना परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते. पण काही दिवसांपासून हे दोघेही खुप चर्चेत आहे. दोघांचे नाते ठिक नसल्याचे म्हटले जात आहे.

समंथा आणि चैतन्यचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याच्या बातम्या समोर येत होत्या, पण समंथाने आता तिच्या पतीच्या म्हणजेच नागा चैतन्यच्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. त्यामुळे समंथा आता चांगलीच चर्चेत आली आहे.

समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून घेतले होते. तिथूनच या चर्चांना सुरुवात झाली होती. दोघेही लवकरच वेगळे होऊ शकतात, अशा चर्चा रंगल्या होत्या. याबद्दल तिला प्रश्नही विचारण्यात आला होता, पण तिने मौन बाळगले होते.

तसेच नागा चैतन्यही या सर्व प्रकरणावर मौन बाळगून आहे. अशात त्याने त्याचा पुढील चित्रपट लव्हस्टोरीचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये चैतन्यसोबत अभिनेत्री साई पल्लवी दिसून येणार आहे. चैतन्यने शेअर केलेल्या या पोस्टवर आता समंथाने कमेंट केली आहे.

विजेता! टीमला शुभेच्छा. साई पल्लवी #LoveStoryTrailer, अशी कमेंट समंथाने चैतन्यच्या पोस्टवर केली आहे. ही पोस्ट पाहून समंथा आणि चैतन्यचे चाहते भलतेच खुश झाले आहे. अभिनेत्रीच्या कमेंटवरुन असे दिसत आहे की तिचे आणि चैतन्यचे नाते पुर्णपणे ठिक आहे. ज्या बातम्या येत होत्या त्या फक्त अफवा होत्या.

दरम्यान, एका मुलाखतीत समंथाने अभिनयापासून आपण थोडा ब्रेक घेणार असल्याचे म्हटले होते. तिच्या १०-११ वर्षांच्या कारकिर्दीत ती सतत काम करत आहे. तिने लग्न झाल्यानंतरही ब्रेक नव्हता घेतला. आता तिने अभिनयातून १-२ वर्षांचा ब्रेक घेणार आहे, असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर, म्हणून आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला”
‘हा काय मुर्खपणा सुरू आहे…’ भारतातील महिला अत्याचारांवर अभिनेत्रींचा उद्विग्न सवाल
महीलेने कारल्याचा ज्युस पिऊन तब्बल ४० किलो वजन घटवले; लोकांच्या टोमण्यांनी झालती हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.