मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
‘सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून राजकारण करणे हे धोकादायक आहे. अशा यंत्रणांचा गैरवापर करून सरकारे पाडणे अथवा बनवणे म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जात असल्याचे सेनेने म्हटंले आहे.
याच बरोबर ‘सत्ता येते आणि जाते, पण राज्य आणि देश टिकायला हवा. माणसे जगली तर राज्य टिकेल. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून सरकारने माणसे जगविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र विरोधकांनी माणुसकीशून्य राजकारण नव्याने सुरू केलीय, असे सामनातून म्हटंले आहे.
मुंबई पोलीसांना माफीया म्हणने भाजपला मान्य आहे का?
मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगना राणावतने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत भाष्य केले आहे. ‘कंगनाने मुंबईची ‘पाकिस्तानव्याप्त काश्मिर’ अशी तुलना केली होती. तसेच मुंबई पोलिसांना माफीया म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग, जाणून घ्या कसे बनले अविनाश भोसले करोडोंच्या कंपनीचे मालक
सावधान! अनेक कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ‘ही’ भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका
कोर्टाला काही वाईट बोललं तर तो अवमान मग मुंबई महाराष्ट्राला बोललं तर ती बदनामी नाही का?