विराटच्या मदतीला धावला सलमान; इंग्लंडच्या माजी कप्तानाला झापत केली विराटची पाठराखन

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज कर्णधार विराट कोहली हा त्याच्या खेळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच भारतीय संघाला अनेक स्पर्धा जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. जगभरात विराटचे अनेक चाहते आहेत. आता त्याच्या कामगीरीवरून दोन खेळाडू आमनेसामने आले आहेत.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराट कोहलीवर टीका केली होती. आता त्या टीकेला पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट याने त्याला उत्तर देऊन कोहलीची पाठराखण केली आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या खेळाडूने केलेल्या कौतुकामुळे चर्चा सुरू झाली आहे.

सलमान बटने मायकल वॉनला विराटच्या क्रिकेटमधील रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे. याबाबत मायकल वॉनने न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याच्या खांद्यावरुन टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर टीका केली होती.

तो म्हणाला, विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही, असे वॉनने म्हंटले आहे. यामुळे त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.

विल्यमसन तीन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर १०० मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडे जाहिराती नाहीत. तो मोठी कमाई करत नाही, असे वॉनने म्हटले आहे.

यावर विराटची बाजू घेत, पाकिस्तानच्या सलमानने उत्तर दिले आहे. तो म्हणाला, विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील तुलना चुकीची आहे. विराट कोहली ज्या देशाचा आहे, त्याची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्याचे फॅन्स जास्त आहेत.

त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतक झळकावली आहेत. सध्याच्या काळातील कोणताही बॅट्समन त्याच्या जवळपास नाही. तो रँकींगमध्ये अव्वल आहे. असे सलमानने म्हटले आहे. यावरून त्याने विराटची बाजू घेतली आहे.

ताज्या बातम्या

एकाच नवरीच्या दारात उभे राहिले दोन नवरदेव, पाहूणेमंडळी झाले हैराण; जाणून घ्या नेमकं काय घडलं

ममता सरकारमधील मंत्र्याच्या घरावर सीबीआयची धाड; मंत्र्यासह दोन आमदारांना घेतले ताब्यात

जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.