सुशांत प्रकरणातील ‘त्या’ मुद्द्यावर अखेर सलमान खानने सोडले मौन; म्हणाला..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावतने देखील बॉलिवूड मधील नेपोटीजम विरुद्ध भाष्य केले होते.

अशातच आता अभिनेता सलमान खान याने देखील नेपोटीजमच्या मुद्द्यावर मौन सोडले आहे. लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे १४वे पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या नेपोटीजमच्या मुद्द्यावरून वाद पाहायला मिळाला होता.

याच पार्श्वभूमीवर सलमानने विकेंडच्या भागात स्पर्धकांची शाळा घेत नेपोटीजमच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक राहुल वैद्य याने कुमार सानू यांचा मुलगा जान सानू याला नेपोटीजमवरून टोमणा मारला होता. याचाच धागा पकडत सलमानने राहुलला प्रश्न विचारला. कोणत्या बापाने आपल्या मुलाला केलेली मदत म्हणजे नेपोटीजम आहे का? असा सवाल राहुलला विचारले.

दरम्यान, याबाबत बोलताना सलमानने शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचे उदाहरण राहुल वैद्यला दिली. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तोच कलाकार टिकतो ज्याला लोक पसंत करतात, असे सलमानने सांगितले.

याचबरोबर शाहरुख खान आणि अक्षय कुमार दोघेही आउटसाईडर आहेत. या दोघांचंही या इंडस्ट्री बरोबर काहीही कनेक्शन नव्हते. परंतु, तरीही आज हे दोघे २० ते ३० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत टिकून आहेत, असे सलमानने यावेळी बोलताना सांगितले.

 

महत्त्वाच्या बातम्या 

‘या जगात २ व्यक्तींना शोधणं अशक्य, पहिला मोदींचा क्लासमेट अन् दुसरा…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.