बॉलिवूडमधील ‘करण अर्जुन’ची जोडी पुन्हा एकदा येणार रुपेरी पडद्यावर

बॉलिवूडमधील करण अर्जुनची म्हणजेच शाहरूख खान आणि सलमान खानची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. पण गेले अनेक वर्ष हे दोघे एकत्र कोणत्या चित्रपटात दिसले नाहीत. पण प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली आहे कारण शाहरूख आणि सलमान खान एकत्र एका चित्रपटात दिसणार आहेत.

२०१८ मध्ये झिरो या चित्रपटापासून शाहरूख खानने कोणताही चित्रपट केलेला नाही. मात्र, शाहरुख खानने शाहरुख खान लवकरच पठाण या चित्रपटात दिसणार असून त्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अशीही बातमी येत आहे की, सलमान खानदेखील या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे.

सलमान खान या सिनेमात एक पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका पादुकोण मुख्य नायिका असणार आहे. सलमान खानने शाहरूख खानच्या ‘झिरो’ सिनेमातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तो शाहरूख खानसोबत या सिनेमातील एका गाण्यात डान्स करताना दिसला होता.

‘तो’ फडणवीस सरकारचाच प्लान होता; कॉंग्रेसने दिले सगळे पुरावे

‘ही’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे प्रभासची क्रश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.