सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

अभिनेता सलमान खानचा राधे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सध्या कोरोनामुळे भारतात हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. असे असले तरी या चित्रपटाने एकाच दिवसात मोठी कमाई करून सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.

भारतासह परदेशात देखील या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले. ‘राधे’ चित्रपटाने यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४ लाख डॉलर म्हणजेच २.७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

येथे ७०० पेक्षा जास्त चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित केला आहे. राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचे डिजिटल, थिएटर आणि सॅटेलाइट हक्क हे जवळपास २३० कोटी रुपयांना विकले गेले होते.

यामुळे हा चित्रपट मोठी कमाई करणार हे जवळपास निश्चित होते. आता विकेंडला चित्रपट किती कमाई करणार हे लवकरच समजेल. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या नजरेस पडला आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.

या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कलाकार आहेत. यामुळे चित्रपटात उत्सुकता वाढते. दिशा पटानीच्या जबरदस्त डान्समुळे या चित्रपटात रंगत आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९ मध्ये करण्यात आली होती. २०२० मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर काल हा चित्रपट प्रदर्शित झाला.

ताज्या बातम्या

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ते अगदी खर; पहा उर्मिला कोठारे आणि चिमुरड्या जीजाचा डान्स

एक चुकीचा शब्द पडला महागात, ‘तारक मेहता..मधील बबितावर विविध ठिकाणी गुन्हा दाखल; जामीनही नाही मिळणार

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.