कोरोना संकटात हजारो लोकांना जेवन पुरवणारा सलमान स्वत: गेला जेवनाची टेस्ट घ्यायला

मुंबई । सध्या कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अनेकांचे मोठे हाल होत आहेत. अनेक कोरोना योद्धा रोज आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. पण कधी कधी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, असे असताना अभिनेता सलमान खानने आता मोठी मदत सुरू केली आहे.

सलमानच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचारी यांच्यासाठी रोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे. सलमानने यासाठी पुढाकार घेतला आहे.

सलमानची स्वयंसेवी संस्था आणि ‘आय लव्ह मुंबई’ ही स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मुंबईतील विविध भागांमध्ये जात  Being Haangryy  नामक फूड ट्रकच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होत आहे.

आज सलमान खान याने फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत तो चांगल्या प्रतीचा असल्याची खात्री केली. यानंतर वाटप करण्यात आले. ‘यावेळी सलमानने नाश्ता तयार करणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नाश्त्यामध्ये पाव भाजी बनवण्यात आली होती.

यापूर्वी देखील ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. तसेच हजारो मजुरांना सलमानने आर्थिक मदत केली होती. मदत पोहोचत आहे की नाही याची खात्री तो स्वता करतो.

कोरोना काळात अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक बॉलीवूड कलाकार देखील यामध्ये पुढे आहेत. यामुळे अनेकांना मोठा आधार मिळत आहे. सध्या अशा गरजेची अनेकांना गरज आहे.

ताज्या बातम्या

५०० रूपयाचे रेमडेसिवीर ७० हजारांना विकणाऱ्या मेडीकल चालकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खुपच आलिशान; पहा फोटो

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कधी लागते.? एम्सचे डॉक्टर म्हणतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.