..त्यावेळी सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या; पण त्याच्या एका चुकीमूळे…

आज कोणीही सलमान खानला पाहिले तर सर्वजण एकच प्रश्न विचारतात. तो प्रश्न असतो की, सलमान खान लग्न कधी करणार? पण या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत कोणालाही मिळालेले नाही. पण बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी हा खुप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे.

सलमान खान नेहमी या प्रश्नाचे उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यामूळे तो लग्न करणार की नाही? हाच मोठा प्रश्न आहे. सलमान खान अनेक वेळा बोलतो की, तो लग्नसाठी तयार आहे. पण त्याला लग्न करण्यासाठी हवी तशी मुलगी भेटत नाही.

असे नाही की, सलमान खान कधी प्रेमात नाही पडला. तो एकदा नाही तर अनेकदा प्रेमात पडला आहे. पण त्याचे कोणतेही नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. म्हणून तो अजूनही एका चांगल्या मुलीच्या शोधात आहे. त्याचा हा शोध कधी पुर्ण होईल हे त्यालाच माहिती.

सलमान खानने करिअरला सुरुवात करण्याअगोदरपासूनच बॉलीवूडमध्ये त्याचे प्रेम प्रकरणं गाजली आहेत. त्याचे सर्वात जास्त गाजलेले प्रेम प्रकरण म्हणजे ऐश्वर्या रायसोबतचे. सलमान खान ऐश्वर्याच्या प्रेमात पागल झाला होता. पण त्याच्या रागीट स्वभावामुळे ऐश्वर्या त्याला सोडून गेली.

आज आम्ही तुम्हाला सलमान खानच्या एका अशा गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत जी एका भारतीय क्रिकेटरची पत्नी आहे. त्यासोबतच ती ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे संगीता बीजलानी. संगीताने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सलमान खानने ज्यावेळी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. त्यावेळी तो संगीताच्या प्रेमात झाला होता. संगीता देखील सलमान खानवर खुप जास्त प्रेम करत होती. त्यामूळे ते दोघे लवकरच लग्न करतील असे बोलले जाऊ लागले.

या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते एकमेकांना चांगले ओळखू लागले होते. त्यानंतर सलमान खान आणि संगीता बीजलानीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या. पण लग्नाच्या काही दिवस अगोदर लग्न कॅन्सल करण्यात आले. सगळी तयारी झाली होती. पण या दोघांचे लग्न मात्र होऊ शकले नाही.

असे बोलले जाते की, सलमान खानच्या स्वभावामुळे या दोघांमध्ये भांडण झाले आणि हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर या दोघांनी करिअरमध्ये लक्ष दिले. १९९६ मध्ये संगीता बीजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले.

संगीता आणि मोहम्मद या दोघांची लव्ह स्टोरी खुप जास्त प्रसिद्ध होती. पण या दोघांचा संसार जास्त दिवस टिकला नाही. ते लवकरच वेगळे झाले. आपल्या पतीपासून वेगळं झाल्यानंतर संगीता आणि सलमान खानमध्ये परत मैत्री झाली.

सलमान खानचे क्रिकेटरच्या पतीसोबत अफेअर होते. पण त्याला त्याचा फायदा झाला नाही. जर सलमान खानचे त्याच्या करिअरच्या सुरुवातीला संगीतासोबत लग्न केले असते. तर तो आज नक्कीच दोन मुलांचा बाप असता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.