‘तुम्हाला मी सोडणार नाही’; ‘त्या’ प्रेक्षकांना सलमान खानने दिली कायदेशीर कारवाईची धमकी

[15:17, 5/16/2021] Vivek Panmand: सलमान खानच्या चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहून असतात. सलमान खानचा राधे चित्रपट पण काही दिवसांपूर्वीच ओटीपी प्लॅटफॉर्मवर आला. चित्रपट कोरोनाच्या भीतीमुळे चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आला नाही.

राधे चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यामुळे त्याच्या पायरेसीचा धोका पण मोठ्या प्रमाणावर वाढला होता. काही प्रेक्षकांनी तर राधे चित्रपटाची पायरेटेड कॉपी पहिली. अशा प्रेक्षकांवर सलमान खान प्रचंड चिडला आहे.

त्याने म्हटले आहे की, तुम्ही जर पायरेटेड सिनेमा पहिला असेल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. राधे चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मवर फक्त २४९ रुपयांना दाखवण्यात आला. तरीही तुम्ही जर पायरेटेड साईट्सवर पाहत असाल तर हा गुन्हा आहे. तुम्ही जर या पायरेटेड साईट्सचा भाग बनत असाल तर हा गुन्हा आहे.

कृपया परिस्थिती समजून घ्या अन्यथा तुमच्यावर पण कारवाई होऊ शकते असा इशाराच सलमान खानने दिला आहे. त्याने केलेले हे ट्विट सोशल माध्यमावर चर्चेत असून पायरेटेड चित्रपट पाहणाऱ्यांची पण याचा धसका घेतला आहे.

१३ मेला सलमान खानचा राधे चित्रपट रिलीज करण्यात आला. भारतात तो zee5 च्या झी प्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आला. एकाच दिवशी बऱ्याच जणांनी लॉग इन केल्याने झी ५ चे सर्व्हर डाऊन झालेलं दिसून आले.

भारताबाहेर पण दुबई आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट पहिला गेला. एईच्या फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये २.९५ कोटी रुपयांची कामे केली. राधेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पण सांगण्यात आले.

ताज्या बातम्या
शाब्बास पठ्ठ्या! गावाकडच्या मेकॅनिकने लावलाय भन्नाट शोध; १ लीटरमध्ये गाडी देते १५० किलोमीटर ॲव्हरेज
मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला; सातवांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंची रडवणारी पोस्ट

या मेकॅनिकने लढवलीय अशी शक्कल की फक्त एका लिटरमध्ये गाडी देते 150 किलोमीटर ॲव्हरेज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.