अविवाहीत सलमान खान होणार दोन मुलांचा बाप; स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाला..

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा आता आई झाली आहे. गुरुवारी, इंस्टाग्रामवर, तिने आपल्या जुळ्या मुलांची आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. सरोगसीच्या माध्यमातून प्रीती आई झाली. त्यांनी मुलांची नावे जय आणि जिया ठेवली आहेत.

प्रीतीच्या घरातील लहानमुलांच्या किलकारीमुळे इंडस्ट्रीतील लोक आणि चाहते खूप खूश आहेत, तर आता पुढचा नंबर कोणत्या सेलिब्रिटीचा आहे, असा अंदाजही सोशल मीडियावर लावला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सरोगसीद्वारे पालक बनण्याचा ट्रेंड वाढला आहे. अभिनेत्यांची जीवनशैली, वय आणि वैद्यकीय शरीरयष्टी पाहून काही वेळा डॉक्टरही त्यांना तसा सल्ला देतात. अशाप्रकारे, पालक बनण्याच्या साखळीतील पुढचे नाव सलमान खानचे असण्याची शक्यता आहे. होय, ही गोष्ट एवढीच निर्माण झालेली नाही, तर खुद्द ‘दबंग खान’ने अनेकदा याकडे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडमध्ये सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे. शाहरुख खान-गौरी खान, आमिर खान-किरण राव, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, लिसा रे-जेसन या जोडप्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला, तर करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारख्या अविवाहित सेलिब्रिटींनीही सरोगसीचा पर्याय निवडला.

दरम्यान, सरोगसी विधेयक (नियम) 2018 मध्ये बदलण्यात आले आहे. यामध्ये अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यामुळे सरोगसीद्वारे एकट्या पुरुष किंवा स्त्रीला पालक बनणे कठीण होऊ शकते. मात्र सलमान खानने यापूर्वी जे काही बोलून दाखवले त्यावरून असे दिसते आहे की तो लवकरच बाप होऊ शकतो.

‘बिग बॉस 15’मधील वीकेंड का वॉर एपिसोडमध्ये सलमानची मैत्रिण आणि अभिनेत्री राणी मुखर्जी स्टेजवर पोहोचली होती. राणी ‘बंटी और बबली 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यादरम्यान राणी सलमानला म्हणाली, ‘सलमान, मागच्या वेळी जेव्हा मी इथे आले होते तेव्हा तू मला सांगितले होते की तुला मूल होणार आहे, ते मूल कुठे आहे?’ यावर सलमानने गंमतीने सांगितले की, ते मूल प्रोसेसमध्ये आहे. मात्र यानंतर सलमान इशाराकरत असे काय म्हणाला, याकडे लक्ष द्यावे लागेल.

त्यानंतर राणी सलमान म्हणाली, ‘हे ऐकून मला वाईट वाटले. पण ‘बंटी और बबली 3’ येईपर्यंत हे नियोजन व्हायला हवे. यावर सलमान इशारा करत म्हणाला की, तोपर्यंत एक नाही तर दोन होतील. तोपर्यंत बंटी आणि बबली दोघेही पूर्ण होतील.

सलमान खानने वडील होण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलमान खानचे मुलांवर किती प्रेम आहे हे आपण सर्वांनी पाहिले आहे. काही वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये सलमानच्या लग्नाबाबत चर्चा झाली होती, तेव्हा तो म्हणाला होता, ‘माझे लग्न कधी होणार हे मला माहीत नाही, पण मी नक्की बाप होणार आहे’.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.