सलमान खानला लग्नासाठी हवी आहे ‘अशी’ मुलगी पण…

सलमान खान बॉलीवूडचा भाईजान आहे. त्याचा बॉलीवूडमध्ये खुप जास्त दबदबा आहे. सध्या बिग बॉसच्या नव्या सीजीनमूळे खुप जास्त चर्चेत आहे. त्याने या शोसाठी आत्तापर्यंतचे सर्वाधिक मानधन घेतले आहे.

सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामूळे जास्त चर्चेत असतो. त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना जास्त रस असतो. यामुळेच अनेक वेळा त्याला त्याच्या मुलखातीमध्ये अनेक प्रश्न वैयक्तिक आयुष्याशी निगडीत विचारले जातात.

कारण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी काहीना काही सुरू असते. जसे की, त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत असणारे रिलेशनशिप. तो त्याच्या रिलेशनशिपमूळे नेहमीच चर्चेचा विषय बनतो. त्याचे हे रिलेशनशिप त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच सुरू आहेत.

सलमान खान अनेक वेळा त्याच्या मुलखातींमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करतो. असा एक खुलासा त्याने एका मुलाखतीमध्ये केला होता. ही मुलखात गॉसिप मॅगझीन मायापुरीने घेतली होती.

सोमी अली, संगीता बीजलानी, शाहीन, ऐश्वर्या राय आणि कतरीना कैफ ही त्याची सर्वात जास्त गाजलेली प्रेमसंबंध आहेत. ९० च्या दशकामध्ये ज्या वेळी तो संगीता बीजलानीला डेट करत होता. त्यावेळी त्या दोघांचे अचानक ब्रेक अप झाले होते.

या ब्रेकअप नंतर बॉलीवूडमध्ये चर्चा होती की, सलमान खानने त्याची गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला सोडले आहे. तो त्याची पहिली गर्लफ्रेंड शाहीनकड परत गेला. मुलाखती दरम्यान पत्रकार चंदा टंडनने याच गोष्टीविषयी सलमानला प्रश्न विचारला होता.

यावर सलमान खान प्रचंड चिडला होता. तो म्हणाला होता की, माझं वैयक्तिक आयुष्य फक्त माझं आहे. यात दुसर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. माझे हजारो स्त्रियांशी संबंध राहिले असतील. पण हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे’.

सलमान खानच्या या उत्तरानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. या गोष्टीला मीडियाने खुप जास्त उचलून धरले होते. यावेळी सलमान खाननं त्याच्या लग्नाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

तो म्हणाला होता की, ‘मला प्रथम सेटल व्हायचे आहे. तसेच स्वतःचे घर आणि कारसह इतर गोष्टी मिळवायच्या आहेत आणि मग लग्न करायचे आहे. मला एका भारतीय महिलेसारखी पत्नी हवी आहे. चालण्याची उठण्याची बसण्याची समज असलेल्या मुलीशी मला लग्न करायचे आहे’.

सलमान खानच्या या मुलखातीच्या प्रचंड चर्चा झाल्या होत्या. पण आजही सलमान खानचे लग्नाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आजही लोक तो कधी लग्न करेल हाच प्रश्न विचारत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.