ऐश्वर्याच्या प्रेमात पागल होता ‘हा’ अभिनेता, सतराव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा केला प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायच्या भूतकाळावर नेहमीच चर्चा होत राहील आहे. मात्र ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच लग्न झाले. या दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचा सुखाचा संस्कार चालू आहे. पण एक काळ असाही होता तेव्हाचे ऐश्वर्याबाबतचे किस्से बॉलिवूडमध्ये आजही सांगितले जातात.

अभिषेक बच्चन सोबत लग्न करण्याच्या आधी बऱ्याच व्यक्तींसोबत ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते. यामध्ये सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि राजीव मूलचंदानी ही नावं प्रमुख आहेत. यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीच्या लव्हस्टोरीची चर्चा खूपच रंगली आहे. दोघांच्या भूतकाळातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही समोर आल्या नाहीत.

सलमान आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी त्यांचा ब्रेकअप हा खूप मोठा धक्का होता. आज तुम्ही त्याच्या लव्हस्टोरी दरम्यानची एक घटना वाचणार आहात. सलमानवर प्रेम करणाऱ्या ऐश्वर्याने त्याला लग्नाला नकार दिल्यानंतरचा हा प्रकार आहे.

सलमान आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी प्रचंड गाजली. दोघांच ऐकमेकांवर खूप प्रेम होतं. पण ऐश्वर्याने काही कारणास्तव सलमानला लग्नाला नकार दिला. यानंतर प्रेमात वेडा झालेल्या सलमानने हद्दच केली होती. त्याने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्रास दिला.

ऐश्वर्याने लग्नाला नकार दिल्यानंतर घडलेली ही गोष्ट अनेकांना महिती नसेल. यामध्ये लग्नाला होकार मिळवण्यासाठी सलमान इमारतीच्या सतराव्या मजल्यावर चढून एश्वर्याला लग्नासाठी विनवणी करत होता. होकार दे, हो म्हण नाहीतर मी येथून खाली उडी मारेन अशी धमकी सलमानने दिली होती. यानंतर त्याने ऐश्वर्याच्या अपार्टमेंटमध्ये येऊन तिच्या घराचा दरवाजा रात्रभर वाजवत होता.

दरम्यान, रात्रभर ऐश्वर्याच्या घराचा दरावाजा वाजवणाऱ्या सलमानच्या विरोधात ऐश्वर्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. हा सर्व प्रकार २००१ मध्ये घडला होता. यानंतर २००२ साली सलमानने एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना सांगितले होते की, ‘’ऐश्वर्या सोबत माझे रिलेशन होते. आमच्यात भांडण झाले, पण आमचे ऐकमेकांवर प्रेमही होते. मी असे तर करणार नाही की, ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्या व्यक्तीशी मी भांडण केसे करु’’

ऐश्वर्या आणि सलमानला पडद्यावर बघायला प्रेक्षकांना खूप आवडत होते. या जोडीने ‘हम दिल दे चुके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या जोडीने बराच काळ फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला होता.

महत्त्वाच्या बातम्या-
सलमान खानच्या गर्लफ्रेंडमूळे नाही तर ऐश्वर्याच्या वडिलांमूळे झाले होते त्यांचे ब्रेकअप; सलमानने केला खुलासा
सलमान खानच्या ‘त्या’ स्वभावाला कंटाळून ऐश्वर्याने केले होते त्याच्याशी ब्रेकअप
बॉयफ्रेंडसाठी एकमेकींशी भांडल्या होत्या ऐश्वर्या आणि मनीषा; मग झाले असे काही की….
‘या’ मुलीमुळे झाला होता सलमान खान व ऐश्वर्या रायचा ब्रेकअप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.