Share

‘त्या’ वादानंतर सलमान खानने उद्ध्वस्त केले अरिजित सिंगचे करिअर, वाचा नेमकं काय घडलं होतं?

भारतीय गायक आणि संगीतकार अरिजित सिंग याचा काल ३५ वा वाढदिवस होता. अरिजित सिंग त्याच्या रोमँटिक आणि हृदयस्पर्शी गाण्यांसाठी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘८३’,’हीर रांझना’,’बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या चित्रपटात अरिजित सिंगने गाणी गायली आहेत.२०११ पासून अरिजित सिंगचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला.(Salman Khan ruined Arijit Singh’s career after ‘that’ controversy)

त्याने गायलेली अनेक गाणी गाजली आहेत. अरिजित सिंगची मोठ्या आणि हिट चित्रपटांमध्ये एक दोन नव्हे तर ५ ते ६ गाणी ऐकायला मिळतात. मात्र गेल्या 6 वर्षांपासून त्यांची कारकीर्द थोडीशी डळमळीत झाली आहे. अरिजित सिंगची कारकीर्द डळमळीत करण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा(Salman Khan) हात असल्याची माहिती मिळत आहे.

२०१४ मध्ये गायक आणि संगीतकार अरिजित सिंग एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. सलमान खान आणि रितेश देशमुख या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होते. या पुरस्कार सोहळ्यात अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार घेण्यासाठी अरिजित सिंग स्टेजवर गेला.

त्यावेळी बॅकग्राउंडमध्ये ‘मेरी आशिकी तुम ही हो’ हे गाणे वाजत होते. यावेळी स्टेजवर येताच अभिनेता सलमान खानने गायक अरिजित सिंगची खिल्ली उडवली. तू पुरस्कार सोहळ्यात झोपला होता का? असा प्रश्न अभिनेता सलमान खानने गायक अरिजित सिंगला विचारला. त्यावर गायक अरिजित सिंगने ‘हो’ असे उत्तर दिले.

तुझी गाणी वाजवली तर लोकांना झोप येते, अशी खिल्ली सलमान खानने अरिजित सिंगची उडवली. त्यानंतर गायक अरिजित सिंगने देखील अभिनेता सलमान खानला खोचक टोला लगावला. माझ्या गाण्यामुळे नाही तर तुमच्या बोरिंग सूत्रसंचलनामुळे मला झोप आली होती, असा टोला अरिजित सिंगने लगावला होता.

यावर अभिनेता सलमान खान नाराज झाल्याचे देखील सांगण्यात येत होते. अभिनेता सलमान खानने ‘सुलतान’ चित्रपटातील एका गाण्यातून गायक अरिजित सिंगला काढले होते. सुरवातीला ‘सुलतान’ चित्रपटातील ‘जग घुमया’ हे गाणे अरिजित सिंग गाणार होता. पण अभिनेता सलमान खानने त्याची हकालपट्टी केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

अरिजित सिंगने २०१६ मध्ये त्या गाण्यातून काढून टाकल्यानंतर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये अरिजीतने ते गाणे काढून टाकू नका अशी विनंती केली होती. तसेच अभिनेता सलमान खानची माफीही मागितली. पण यावर अभिनेता सलमान खानकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यानंतर गायक अरिजित सिंगने ही पोस्ट डिलीट केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
मंडपातच नवरदेव-नवरीने एकमेकांना धु-धु धुतले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मी हिच्यासाठी मरतोय; तरूणाने प्रेयसीचा फोटो फोटो अपलोड करून स्टेटस टाकले अन् काही क्षणात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सापडले अडचणीत; ‘या’ प्रकरणी हरीयाणा पोलीसांत तक्रार दाखल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now