म्हातारा झाला तरी रोमान्स करतो, लाज वाटत नाही का? लोकांनी झापल्यावर सलमान म्हणतो…

बॉलिवूडचा दबंग असणाऱ्या सलमान खानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान, दिशा पाटणी आणि रणदीप हुड्डा यांचा ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ईदच्या शुभमुहूर्तावर रिलीझ होणार आहे. सलमान खानचा हा चित्रपट चित्रपटगृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पण प्रदर्शित केला जाणार आहे.

सलमान खान त्याच्या चित्रपटांमध्ये ऍक्शन करताना दिसतो. त्याचा हा चित्रपट पण ऍक्शन वर आधारित असून तो यात दिशा पाटनीसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सलमान यात दिशाला किस करताना दिसून येणार आहे. सलमान खानने हा किस डक्ट टेपच्या मदतीने घेतला आहे .

सलमान दिशा पाटणीला किस करणार म्हटल्यावर त्याला ट्रोलर्सने पण सुनावले आहे. या वयात रोमान्स करताना लाज नाही वाटत का? इतका म्हातारा झाला असताना दिशासोबत कसा रोमान्स करू शकतो? अशा शब्दात ट्रोलर्सने सलमान खानला ट्रोल केले आहे. सलमान खानने पण मग त्याच्या भाषेत प्रेक्षकांना सुनावले आहे.

सलमान खानने या ट्रोल्स वर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “मी या वयात ऍक्शन करू शकतो, तर रोमान्स का नाही? असा उलट सवालच त्याने टीकाकारांना विचारला आहे. तो पुढे म्हणतो की, दिशासोबत रोमान्स करताना पण मी तिच्या वयाचा दिसत आहे, असे प्रश्न विचारू नका असे सलमानने टीकाकारांना म्हटले आहे.

‘राधे योर मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका चर्चेने जोर धरला होता. या ट्रेलरमध्ये सलमान खान दिशा पाटनीला किस करताना दिसला होता. दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात चित्रपटाची सगळी टीम दिसून आली आहे.

सलमान खान व्हिडिओत बोलताना म्हणतो की, “चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे. पण मी दिशाला किस केलेले नाही.सलमान पुढे म्हणतो की, “मी दिशाला किस केलेला नाही,तर सेलटोपवर किस केले आहे” असे व्हिडिओमध्ये सलमानने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.