Share

Salman Khan : कार बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार; सलमान खानला पुन्हा एकदा आली जीवे मारण्याची धमकी

salman-khan

Salman Khan : बॉलिवूडचा(Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांचा लाडका सलमान खान(Salman Khan) पुन्हा एकदा धमकीच्या छायेत आला आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर सलमान खानविरोधात धोकादायक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमानच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची आणि थेट घरात घुसून त्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे.

या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमान खानवर बिष्णोई गँगकडून(Bishnoi Gang) सतत धमक्या दिल्या जात आहेत. काळवीट शिकार प्रकरणात त्याच्या नावाचा उल्लेख झाल्यापासून तो या टोळीच्या रडारवर आहे.

काही महिन्यांपूर्वी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले होते, कारण सिद्दीकी आणि फिल्म इंडस्ट्रीतले संबंध खूप जवळचे होते. बिष्णोई गँगनेच ही हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या(Salman Khan) सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. सध्या तो कुठेही जाताना मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि खासगी सुरक्षारक्षकांच्या गराड्यात दिसतो. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटला देखील कठोर सुरक्षा देण्यात आली आहे, आणि घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत.

पण तरीही, आता पुन्हा सलमानच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची आणि त्याला घरात घुसून मारण्याची धमकी आल्याने चिंता वाढली आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तपास जलदगतीने सुरू आहे.
salman-khan-receives-death-threat-again-2

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now