सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे.(salman khan phone to anupam kher after watching the kashmir files)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि आमिर खान यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी अभिनेते अनुपम खेर यांना फोन केला होता.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत अभिनेते अनुपम खेर म्हणाले की, “माझा चित्रपट पाहून सलमानने मला फोन केला आणि अभिनंदनही केले”, असे अनुपम खेर म्हणाले आहेत. सलमान खान आणि अनुपम खेर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटात दोघांनी एकत्र भूमिका केली होती. या मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांना चित्रपटाच्या यशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले की, “या चित्रपटाची कामगिरी पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आहेत. या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे.”
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आतापर्यंत तिकीटबारीवर २१७ कोटींची कमाई केली आहे. राजामौली यांचा बहुचर्चित ‘आर आर आर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील प्रेक्षक ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई करेल, असा अंदाज चित्रपट व्यावसायिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये देखील हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पराभवानंतर मुंबईला आणखी एक दणका! ‘त्या’ चुकीप्रकरणी मोठी कारवाई; रोहीत शर्माला शिक्षा
आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी
“आज खरंच बाबा हवे होते”; अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत भावूक झाला मुलगा वरद