Share

बिग बॉसच्या नवीन सिझनसाठी सलमानने वाढवली तिप्पट फी, मागितले तब्बल ‘इतके’ कोटी

salman khan

‘बिग बॉस’ या शो ची लोकप्रियता प्रचंड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागील काही वर्षांपासून बॉलीवूड अभिनेता सलमान खान या शो चा होस्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’ या शो चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अभिनेता सलमान खानने या शो साठी फी वाढवण्याची मागणी केली आहे.(salman khan hike fees for Big Boss 16)

अभिनेता सलमान खानने या शो साठी तिप्पट फी वाढवून मागितली आहे. ‘बिग बॉस'(Big Boss) हा सर्वाधिक पाहिला जाणारा रिअॅलिटी शो आहे. अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करतो. ‘बिग बॉस’ या शो चा नवीन सिझन लवकरच टेलिव्हिजनवर प्रदर्शित केला जाणार आहे. यासाठी निर्मात्यांनी पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला शो होस्ट करण्याची मागणी केली आहे.

पण यावेळी अभिनेता सलमान खानने शो होस्ट करण्यासाठी वाढीव पैशांची मागणी केली आहे. अभिनेता सलमान खानने आपली फी तिप्पट पटीने वाढवली आहे. फी वाढवून न दिल्यास ‘बिग बॉस’ शो होस्ट करणार नसल्याचे सलमान खानने सांगितल्याची माहिती मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या १५ व्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी १५ कोटी रुपये मानधन घेतले होते.

पण १६ व्या सिझनसाठी अभिनेता सलमान खानने प्रत्येक एपिसोडसाठी ४५ कोटी रुपये मानधन मागितल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांनी अद्याप सलमानच्या मागणीवर उत्तर दिलेले नाही. पण अभिनेता सलमान खानची ही मागणी मान्य केल्यास निर्मात्यांना मोठया खर्चाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावेळी अभिनेता सलमान खानने एक अट देखील निर्मात्यांसमोर ठेवली आहे. वाढीव पैसे देण्याची मागणी मान्य न केल्यास शो सोडून देणार असल्याचे सलमान खानने निर्मात्यांना सांगितले आहे. ‘बिग बॉस’ च्या नवीन सिझनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ‘बिग बॉस’ च्या नवीन सिझनमध्ये अनेक नवीन स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ च्या नवीन सिझनमध्ये अर्जुन बिजलानी, मुनव्वर फारुकी, दिव्यांकी त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, आझम फलाह, शिवम शर्मा, जय दुधाणे, मुनमुम दत्ता, जन्नत जुबेर , फैजल शेख, आरुषी दत्ता, पूनम पांडे आणि जैद दरबार स्पर्धक म्हणून दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, परभणीच्या खासदारांची पदाधिकाऱ्यांसोबत थेट मातोश्रीवर एंट्री
लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा
एकनाथ शिंदे गोत्यात, मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार? न्यायालयाने दिला दणका

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now