परत एकदा सलमान खानने दाखवली दरियादिली, राखी सावंतच्या आईची केली मदत

मुंबई| छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बिग बॉस १४ची स्पर्धक राखी सावंत बीग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. अंतिम फेरीत १४ लाख रुपयांची ऑफर स्वीकारत तिने स्पर्धेतून माघार घेतली होती. तिने आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

राखीने सोशल मिडियावर आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. ‘प्लीज माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत’, असे कॅप्शन देत राखीने आपल्या आईचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

राखीने आईसोबतचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये राखी सावंतच्या आईने भाईजान सलमान खानचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद सलमान बेटा. सोहेलजी तुमचे पण धन्यवाद. मी दवाखान्यात असून आतापर्यंत माझे चार किमो झाले अजून दोन किमो बाकी आहे. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे’. असं म्हणत त्यांनी हात जोडून सलमान खानचे आभार मानले आहेत.

 

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना राखी सावंतने सलमान खानच्या ‘बीइंग ह्यूमन’ संस्थेकडे मदत मागितली होती. राखी म्हणाली की, सलमान एक चांगल्या मनाचा माणूस आहे. त्याच्या फाऊंडेशनकडून नक्कीच माझ्या आईच्या उपचारासाठी मदत मिळेल.
महत्वाच्या बातम्या-
जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का
सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको
राखी सावंतच्या आईला झालाय कर्करोग, आईची अवस्था पाहून राखीने केली ‘ही’ विनंती

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.