“तेव्हा सलमान म्हणाला, तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मग डॉक्टर असो वा पैसे मी देईल”

सलमान खानचा राधे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले असून सलमान दाखवून दिले आहे, की त्यांचा बॉलिवूडमध्ये अजून पण बोलबोला आहे. पण तुम्हाला माहिते का सलमान रियल लाईफमध्ये पण एक हिरो आहे.

सध्या सलमान आणि एका कॅन्सर पेशंटची एक स्टोरी खुप व्हायरल होत आहे. जी वाचून तुम्ही पण भावूक व्हाल. नुकताच एका पत्रकाराने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सलमान खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे त्याने सांगितले आहे.

पत्रकाराचे नाव कर्मवीर सिंह चिकारा आहे. त्याने सलमान खानशी जुळलेला आयुष्यातला एक किस्सा शेअर केला आहे. त्यासोबत त्याने त्याची पत्नी आरती चिकारा, सलमान खान आणि तो असा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो २०१९ चा आहे. त्याच्या पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाले पण जेव्हा त्याची पत्नी कॅन्सरशी लढत होती, तेव्हा सलमान खानने किती मदत की होती, कर्मवीरने सांगितले आहे.

फेसबूक पोस्ट-
हा फोटो नोव्हेंबर २०१९चा आहे. जेव्हा माझी पत्नी कॅन्सरशी लढत होती. तिला टाटा कॅन्सर हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ऑपिनियनला उपाचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही मुंबईला कधी तरी यायचो. त्यामुळे आमची सेलिब्रीटींना बघण्याची इच्छा झाली.

मी आरती जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो, तेव्हा काही सेलिब्रीटींच्या घराबाहेर थांबलो होतो. तेव्हा आम्ही सलमान खानच्या बांद्राच्या फ्लॅटसमोर गेलो. तर आरती खुप आनंदी होती कारण तिला सलमानला बघण्याची खुप इच्छा होती. पण त्यावेळी आम्हाला काही सलमानला बघता आले नाही.

त्यानंतर आपला उपचारामुळे पुन्हा एकदा मुंबईला यावे लागले. मी पत्नीला विचारले, तुला जर कोणत्या सेलिब्रीटीला भेटायचे असेल, तर कोणाला भेटशील. तेव्हा तिने सलमान नाव घेतले. मी पण सलमानचा आणि त्याचे वडिल सलीम खान यांचा खुप मोठा चाहता आहे.

त्यानंतर मी खुप प्रयत्न केले आणि सलीम खान यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना माझ्या पत्नीला कॅन्सर असून तिला सलमानला एकदा भेटायचे असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तुला कुठलीह मदत हवी असेल, मग ती पैशांची असो वा डॉक्टरांची आम्ही तुला मदत करु. त्यानंतर त्यांनी लगेच सलमानच्या बहिणीला फोन दिला.

आवाजावर ओळखणे अवघड होते, की ती अर्पिता होती की अलवीरा. पण ती म्हणाली, तुम्ही काही चिंता करु नका, आम्ही तुमची मदत नक्की करु. तसेच तिने मला सलमानच्या मॅनेजरचा फोन नंबर पण लगेच दिला. तसेच सलमानच्या मॅनेजरला मला फोन करण्यास सांगितले.

थोड्याचवेळात मला सलमानच्या मॅनेजरचा फोन आला. त्याने मला आरतीला रुग्णालयात दाखवण्यास सांगितले. कोणतीही मदतीची गरज पडली, तर लगेच माझ्याशी संपर्क साधा असेही सलमानचा मॅनेजर मला म्हणाला. त्यानंतर मी आरतीला रुग्णालात दाखल केले आणि फ्रि झालो तेव्हा मॅनेजरला फोन लावला. त्याने मला मेहबूब स्टुडीओला बोलावले होते, तसेच आरतीला पण सोबत घेऊन येण्यास सांगितले होते.

तेव्हा सलमान आरतीला भेटणार होता. पण तिला सरप्रार्इज द्यायचे होते, म्हणून मी तिला काहीही सांगितले नाही. आम्ही तिथे गेलो तेव्हा लगेच सलमानचा बॉडीगार्ड आला आणि तो आम्हाला आत घेऊन गेला. तेव्हा राधे मधल्या सीटी मार गाण्याची शुटींग चालू होती.

आम्ही काही पावलं चालताच सलमान आमच्यासमोर येऊन बसला. आरतीला विश्वास बसत नव्हता की सलमान तिच्या समोर आहे. ती तेव्हा खुप आनंदी झाली होती. ती आनंदाने नाचायला पण लागली होती. मी आरतीला इतकं आनंदी पहिल्यांदाच पाहिले होते.

सलमान खानने तेव्हा जवळपास अर्धातास आमच्याशी बोलत होता. त्याने आमच्या सर्व गोष्टी गांभीर्याने जाणून घेतल्या. आम्ही त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. कोणत्या डॉक्टरकडे तिचा उपचार सुरु आहे. आमचे मुलं सध्या काय करताय. सलमान खानलाही आम्हाला भेटून आनंद झाला होता, असे वाटत होते.

सलमान म्हणाला, तुम्हाला कोणत्याही गोष्टींची गरज असली, मला फोन करा. डॉक्टर, पैसे कशाचीही चिंता करु नका. तुम्ही आरतीवर उपचार करा. सलमान चित्रपटांमध्ये जसा हिरोचे काम करतो. तसा तो खऱ्या आयुष्यात पण एक हिरो आहे. अशा स्थितीत आपचे नातेवाईक पण आम्हाला वेळ नव्हते, पण सलमानने जे केलं ते खरंच अविश्विसनीय होतं, असे कर्मवीर सिंह चिकारा यांनी म्हटले आहे.

आज कोरोनाच्या संकटात देश सापडला आहे, पण आपण नेहमी पॉझिटीव्ह राहिले पाहिजे. राधे हा चित्रपट आपण सिनेमागृहांमध्ये नाही बघू शकत पण तो चित्रपट आपण ओटीटी प्लॅटफोर्मवर बघू शकतो. आपण एका अशाच माणसाचा चित्रपट बघतोय, ज्याने लाखो लोकांची मदत केली आहे. प्रत्येक माणसात एक सलमान खान आहे. तुमच्यातल्या सलमानला ओळखा आणि लोकांना मदत करा, असेही कर्मवीर सिंह चिकारा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मांजर पिल्लांना घेऊन का जात नाही; चिमुकलीची पिल्लांसाठी तळमळ पाहून तुम्हीही हळवे व्हाल; पहा व्हिडीओ
ही दोस्ती तुटायची न्हाय! दोन मित्रांनी आपल्या कोरोनाग्रस्त मित्रासाठी जे केलं ते पाहून सलाम ठोकाल
आता पेट्रोलच टेन्शन मिटलं, ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर धावतेय, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.