सलमान खानचा मदतीचा सपाट सुरूच, आता २५ हजार मजुरांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये पाठवणार

मुंबई । देशात कोरोनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांना ऑक्सिजन तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अशातच लॉकडाऊन असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.

लॉकडाऊनच फटका बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांना देखील बसला आहे. आता या कामगारांच्या मदतीसाठी सलमान खानने धाव घेतली आहे. यावर्षी सुद्धा सलमानने २५ हजार रोजंदार कामगारांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षापासून सलमान अनेकांना मदत करत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लोइजचे महासचिव अशोक दुबे यांनी नुकताच इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, सलमान खान यांच्या मॅनेजरने FWICI चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्याशी याबाबतीत संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी आमच्याकडून २५ हजार रोजंदार कामगारांच्या बँक डीटेल्स मागवल्या आहेत. सलमान या प्रत्येकांच्या खात्यावर १५०० रुपये पाठवणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी सुद्धा त्याने अशी मदत केली आहे. गेल्यावर्षी इतर उद्योगांप्रमाणे बॉलिवूडला सुद्धा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. काही महीन्यांपासून सर्व सुरळीत होत होते. मात्र दुसऱ्या लाटेने पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे.

यातच हातावर पोट असलेल्या अनेकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक, खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत. या काळात अनेकांनी मदत करणे गरजेचे झाले आहे.

ताज्या बातम्या

“संसदेसाठी, पुतळ्यांसाठी २० हजार कोटी, मग लसीकरणाला ३० हजार कोटी का नाहीत?”

ना रेमडेसिवीर, ना व्हेंटिलेटर, फक्त दोन ड्रॉप देऊन २९ हजार कोरोना रुग्ण बरे; कल्याणच्या डॉक्टरचा दावा

१२०० रूपयांत सुरू केलेला व्यवसाय पोहोचला ५० हजार कोटींमध्ये, वाचा किरण मजूमदार यांची यशोगाथा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.