राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान

बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्यांमध्ये राजकुमारचे नाव सर्वात पहिले येते. राजकुमार यांचा आवाज आणि अभिनयावर आजही लाखो लोकं फिदा आहेत. त्यांचा आवाज त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या अभिनयासोबत त्यांचा दमदार आवाज लोकांना वेडं लावून जायचा. त्यांचा आवाजाचे लाखो दिवाने होते.

पण खुप कमी लोकांना माहिती आहे की, राजकुमार यांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. ज्या आवाजावर लोकं फिदा होते. तो आवाज खराब झाला होता. ही गोष्ट त्यांनी फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमी लपवून ठेवली होती. त्यांच्या कॅन्सरबद्दल फक्त त्यांच्या घरातील काही लोकांना माहिती होते.

राजकुमार त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये खुप एकटे एकटे राहत होते. त्यांनी बाहेर जाणे पुर्णपणे बंद केले होते. एवढेच नाही तर बाहेरील कोणत्याही व्यक्तीला त्यांनी भेटायला परवानगी दिली नव्हती. ते शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते.

त्यांच्या आजाराबद्दल सगळ्यांना समजले तेव्हा सगळे शॉक झाले. त्यावेळी राजकुमार कोणालाही भेटत नव्हते. म्हणून देखील अनेकजण दुखी होते. दुसऱ्या लोकांप्रमाणेच सलमान खान देखील राजकुमार यांचा खुप मोठा फॅन होता.

सलमान ज्यावेळी त्यांच्या तब्येतीबद्दल समजले तेव्हा तो खुप दुखी झाला. त्याने राजकुमारला भेटण्याचा हट्ट केला. अनेकांनी त्याला समजून सांगितले की, ते कोणालाही भेटत नाहीत. त्यामुळे तु त्यांना भेटण्याचा हट्ट सोडून दे.

सलमान मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. राजकुमारला भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. पण त्याला आत प्रवेश मिळाला नाही. म्हणून सलमान खान भिंतीवरून उडी मारून राजकुमारच्या बंगल्यात घुसला होता. त्याला नौकरांनी बघितले आणि जायला सांगितले.

पण सलमान खान मात्र हट्ट धरून बसला की, तो राजकुमारला भेटल्याशिवाय तिथून जाणार नाही. ही गोष्ट राजकुमारला समजल्यानंतर त्यांनी सलमानला बोलावून घेतले. राजकुमारची अवस्था पाहून सलमानच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला नाही.

राजकुमारला बोलता येत नव्हते. पण तरीही त्यांनी सलमानला जवळ बोलवले आणि एक मोलाचा सल्ला दिला. त्यांनी सलमानच्या कानात सांगितले की, ‘मला माहित आहे तु लोकांची मदत करतोस म्हणून नेहमीच अशीच मदत करत राहा. पण त्याबद्दल सगळ्यांना सांगत फिरू नकोस. नाही तर मग त्या कामाचा अर्थ राहणार नाही’.

राजकुमारचे हे शब्द ऐकून सलमान खान खुप भावूक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. आजपर्यंत सलमानने राजकुमारने सांगितलेले शब्द लक्षात ठेवले आहेत आणि तो समाजासाठी काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या –
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता
शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच धडाधड बदलले कपडे; पहा व्हिडिओ..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.