लोकं तर लोकं आता सलमानच्या वडिलांनीही दिला ‘राधे’ला निगेटिव्ह रिव्ह्यु; म्हणाले…

सलमान खानचा चित्रपट राधे या चित्रपटाची चाहते खुप आतुरतेने वाट पाहत होते. आता हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलिज झाला आहे. हा चित्रपट अनेक चाहत्यांना आवडला आहे, तर काहींनी चित्रपट आवडला नाही म्हणत सलमान खानला ट्रोल केले आहे.

सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे, तर टिका करणाऱ्यांनी या चित्रपटावर टिका केली आहे. चित्रपटावर अनेकांनी टिका केल्याने, या चित्रपटाला फार चांगली कमाई करता आलेली नाही, त्यामुळे हा चित्रपट प्लॉप ठरला आहे.

आता सलमान खानच्या राधे चित्रपटाबद्दल त्याचे वडिल सलिम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक सलीम खान यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी सलीम खान यांनीही राधे चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यु दिला आहे.

सलीम खान यांनी बोलताना सलमान खानच्या दबंग ३ आणि बजरंगी भाईजान चित्रपटांची तुलना करत राधेला निगेव्हिव रिव्ह्यु दिला आहे. सलमान खानच्या अगोदरच्या चित्रपटांशी तुलना करत त्यांना राधेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

याआधीचे चित्रपट होते, ते पुर्णपणे वेगळे होते. दबंग ३ वेगळी होती. बजरंगी भाईजान हा चित्रपट चांगला होता आणि पुर्णपणे वेगळा होता. राधे- युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट अजिबात चांगला नाही. पण चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पैसे मिळावे, ही जबाबदारी व्यवसायिक चित्रपटांवर असते, असे सलीम खान यांनी म्हटले आहे.

सलमान खानचे करियर संपत आले आहे, याबाबत होणाऱ्या चर्चेवरही सलीम खान यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, सलमान खानचा अपेक्षित परफॉर्मन्स झाला नाही की प्रत्येकवेळी असेच बोलले जाते. पण सलमान खानचा हिट चित्रपट आला की त्याचीच चर्चा होते, असेही सलीम खान यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे कुठून धरून आणलंय हिला! राखी सावंत मस्तानीच्या वेशात रस्त्यावर शोधतीये आपल्या नवऱ्याला
PSI सह पाच पोलिस निलंबित; निरपराध व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई
कोरोनाचा लवकरच गेम ओव्हर! शास्त्रज्ञांनी शोधले स्वस्त आणि मस्त गुप्त हत्यार, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.