जेव्हा सलमानच्या एका चाहत्याने त्याच्यावर केला होता काठीने हल्ला, वाचा पुर्ण किस्सा

सुपरस्टार सलमान खानची फॅन फॉलोइंग कुणापासून लपलेली नाही. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्याचे थेट उदाहरण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला त्यांचा ‘राधे’ चित्रपट.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतके लोक एकाचवेळी चित्रपट पाहत होते की झी फाईव्हचा सर्व्हर क्रॅश झाला. चित्रपट पाहण्याव्यतिरिक्त सलमानचे चाहतेसुद्धा त्याची एक झलक पाहण्यासाठीही उत्सुक असतात.

भाईजान चित्रपट हिट झाला किंवा कोणता उत्सव असो, चाहते सलमानच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यावेळी कोरोनाच्या महामारीमुळे सलमान खानने आपल्या चाहत्यांना आपण घरातच राहावे असे आवाहन केले.

परंतु बर्‍याच वेळा सेलिब्रिटींना काही चाहतेही मिळतात जे खुप विचित्र असतात ज्याचा कोणीही विचारही करू शकत नाही. असाच एक विचित्र फॅन सलमान खानलाही भेटला होता. त्याने सलमानच्या कमरेवर काठीने वार केले होते.

एवढेच नव्हे तर ही बाब इतकी बिकट झाली होती की केस शांत करण्यासाठी मुंबई पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तर आज आम्ही तुम्हाला नक्की काय घडले होते हे सांगणार आहोत. वृत्तानुसार, ही घटना पहाटे घडली होती.

त्यावेळी सोहेल खान जॉगिंग करून घरी परत येत असताना त्याने पाहिले की एक मुलगा त्याच्या घरासमोर उभा आहे आणि तो त्याचा भाऊ म्हणजे सलमान खानला शिवीगाळ करीत आहे. मुलाच्या तोंडून आपल्या भावासाठी वाईट शब्द ऐकून सोहेल खानला खूप राग आला.

पण तरीही त्याने शांतपणे त्याला असे विचारले की तुला काय त्रास आहे असे का करत आहेस? माझ्या भावाला शिवीगाळ का करत आहेस? तर सोहेलच्या बोलण्याला उत्तर न देता तो मुलगा त्याच्याशी गैरवर्तन करू लागला.

मुलाचे असे वाईट वागणे सोहेलला पटले नाही त्याला खुप राग आला आणि त्याने त्याला एक चापट मारली. संपूर्ण घटना पाहून चौकीदाराने सलमान खानच्या इमारतीच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये फोन लावला आणि त्याला संपूर्ण कहाणी सांगितली.

त्यावेळी सलमान घरीच होता आणि तो लगेच खाली आला. सलमान जेव्हा खाली आला तेव्हा त्याने पाहिले की मुलासह त्याचे काही मित्र सोहेलशी भांडण करण्यासाठी तिथे पोहोचले होते. असे म्हटले जाते की त्या मुलांपैकी एकाने सलमानच्या कमरेवर काठीने जोरदार वार केला होता.

मात्र, त्यानंतर सलमान-सोहेलनेही या मुलांना जोरदार मारहाण केली. परंतु हे प्रकरण वाढत असल्याचे दिसताच पोलिसांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता असे दिसून आले की सर्व मुले सलमान खानचे चाहते आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सहा तास सलमानची भेट घेण्यासाठी ते त्याच्या घराबाहेर वाट पाहत होते. जेव्हा बरीच प्रतीक्षा करूनही सलमान खान त्यांना भेटला नाही, तेव्हा मुलांपैकी एकाने रागाच्या भरात भाईजानच्या घराबाहेर शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

जेव्हा सलमानला समजले की तो आपला चाहता आहे, तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्यावर कठोर कारवाई करू नका आणि फक्त चेतावणी देऊन सोडून द्या. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.