सलमान खान माझे कपडे, बूट संभाळायचा, माझ्यामुळेच त्याला काम मिळाले; जॅकी श्राॅफचा गौप्यस्फोट

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांची मैत्री अनेक दिवसांपासून आहे. अगदी बॉलीवूडमध्ये येण्याच्या सुरुवातीला ते दोघे एकत्र काम करत होते. सलमान खान सुरुवातीला मॉडेलिंग करत होता, तेव्हापासून जॅकी श्रॉफ आणि त्यांची दोस्ती आहे.

या दोस्तीचे रूपांतर कामात झाले आणि सलमानला पहिला ब्रेक मिळाला. एका मुलाखतीदरम्यान जॉकी श्रॉफने त्याच्या आणि सलमान खानचा दोस्तीवर अनेक खुलासे केले आहेत. त्या दोघांची पहिली भेट कुठे झाली, त्या दोघांचे नाते कसे आहे, याबाबत त्यांनी भरभरून सांगितले आहे.

याबाबत काही गोष्टी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल सुरुवातीला सलमान खान जॅकीचे कपडे, बूट संभाळत होता. तो म्हणाला, १९८८ साली फलक चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सलमान माझे कपडे आणि बूट संभाळायचा. अगदी भावाप्रमाणे तो माझी काळजी घ्यायचा. आम्ही सोबत असायचो.

पुढे माझ्यामुळेच त्याला बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर पुढे आमची दोस्ती वाढत गेली. मेने प्यार किया या चित्रपटात त्याला काम मिळाले. आता चित्रपट आला की तो माझ्या नावाचा विचार करतो, असेही जॅकीने आता सांगितले आहे.

यामुळे आता नुकताच रिलीज झालेला राधे चित्रपटात सलमान खान आणि जॅकीची जोडी दिसली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची दोस्ती आहे. याआधी देखील त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या दोघांचे जगभरात अनेक चाहते आहेत.

सलमान खान सध्या बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. जॅकी श्रॉफ देखील अनेक चित्रपट करतो. पण सलमानने देखील सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे आता तो इथपर्यंत पोहोचला आहे. आता त्याच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याचे चित्रपट कोट्यवधीची कमाई करतात.

ताज्या बातम्या

कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार होणार नाही; आयसीएमआर आणि एम्सचा मोठा निर्णय

बाळाच्या तोंडात खड्डा पडला, आईने घाबरून दवाखान्यात नेल्यावर डाॅक्टरांसहीत सर्वांचे हसू थांबेना

माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन, इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.