अबब! ३५० करोड रूपये मानधन घेत सलमान बनला जगातील सर्वात महागडा होस्ट

जगभरात कोरोनामुळे केलेल्या लोकडाऊनमुळे चित्रपट श्रुष्टीवर जणू संक्रांतच ओढवलेली आहे. चित्रपटांचा बिजनेस हा पूर्णतः थेटर्सवरच अवलंबून असतो. कोरोना काळात काही राज्यांमध्ये पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीलाच परवानगी होती तर काही राज्यांनी थेटर्स उघडण्यास देखील परवानगी नाकारली होती त्यात महाराष्ट्र राज्य होतेच.

तरीही मोठी रिस्क घेऊन सलमानने त्याच्या शब्दावर ठाम राहत त्याचा राधे हा चित्रपट १३ मे २०२१ ला ईदच्या दिवशी थेटर्स आणि झी ह्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला परंतु राधे ह्या चित्रपटाला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि राधे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला गेला.

राधेच्या अपयशामागे कोरोनाचा देखील हाथ आहे. नाहीतर सलमान खानचा चाहता वर्ग आणि लोकप्रियता इतकी आहे की राधे पेक्षाही सुमार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे.

राधे चित्रपट जरी फ्लॉप गेलेला असला तरी सलमानच्या बिग बॉस ह्या रियालिटी शोची लोकप्रियता बुर्ज खलिफा इमारती इतकी गगनचुंबी आहे. केवळ सलमानमुळेच बिग बॉस हा रियालिटी शो इतका लोकप्रिय झालेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सलमान खाननेच बिग बॉसची सुरुवात भारतामध्ये केली त्यानंतर अनेक प्रांतीय भाषेत त्याचे शो येऊ लागले.

आपल्या ह्याच लोकप्रियतेच्या जोरावर सलमानने बिग बॉसच्या सिजन १५ साठी तब्बल ३५० कोटी चार्ज केले आहे. इतकी मोठी रक्कम आकारणारा तो जगातील सर्वात महागडा होस्ट बनला आहे. सिजन १५ साठी सलमान खान १४ हप्ता शूटिंग करणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.