गर्लफ्रेंडपायी सलमानने सुनील शेट्टीची हात जोडून माफी मागितली होती; पहा काय होता किस्सा..

फिल्म इंडस्ट्री खुप कमी अभिनेते त्यांच्या शांत स्वाभावासाठी प्रसिद्ध आहेत. कारण इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्याला खुप राग येतो. पण खुप कमी असे आहेत. ज्यांना राग येतो आणि लगेच शांतही होतो. असेच एक अभिनेते म्हणजे सुनील शेट्टी.

सुनील शेट्टीला त्यांच्या शांत स्वभावासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. त्यांना जास्त राग येत नाही. जर राग आला तर मग तो लवकर जात नाही. पण तुम्ही त्यांची माफी मागितली आणि आपली चुक स्वीकार केली. तर त्यांचा राग जातो. असेच एक भांडण ९० च्या दशकात खुप प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी सुनील शेट्टी खुप चिडले होते. त्यांचा राग कमी होत नव्हता. म्हणून शेवटी सलमान खानला सुनील शेट्टीची हात जोडून माफी मागावी लागली होती.

हा किस्सा आहे ९० च्या दशकातील. सुनील शेट्टी बॉलीवूडमध्ये नवीन होते. त्यामूळे ते त्यांच्या करिअरवर लक्ष देत होते. याच कालावधीमध्ये त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली आणि त्यांनी त्या चित्रपटाला होकार दिला.

या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत सलमान खानची गर्लफ्रेंड सोमी अली होती. सोमी अलीला ज्यावेळी समजले की, या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भुमिकेत सुनील शेट्टीला घेण्यात आले आहे. त्यावेळी तिने या चित्रपटाला नकार दिला.

सोमी अली म्हणाली की, ‘मी कोणत्याही स्ट्रगलरसोबत काम करणार नाही’. ही गोष्ट सुनील शेट्टीला समजली तेव्हा ते खुप चिडले. कारण सुनील आणि सोमीने एकाच कॉलेजमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते. दोघेही एकाच वर्गात होते. तरीही सोमी अली त्यांना स्ट्रगलर म्हणाली होती.सुनील शेट्टीला सोमी अलीचा खुप जास्त राग आला होता. या दोघांच्या भांडणात निर्मात्यांनी चित्रपट बंद केला.
मग सुनील शेट्टीने सोमीला माफ केले नाही. त्यांनी तो राग तसाच ठेवला आणि सोमीसोबत असणारी मैत्री तोडली.त्यानंतर सुनील शेट्टीने दुसरे चित्रपट साइन केले. त्यांचा ‘बलवान’ ही चित्रपट सुपरहिट झाला होता. सुनील शेट्टीने बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली होती. पण सोमी अली मात्र अजूनही कामाच्या शोधात होती. तिला चित्रपटांच्या ऑफर येत नव्हत्या.

त्यामूळे तिने सलमान खानची मदत घेतली. सलमान खानच्या सांगण्यावरून सोमी अलीला ‘अन्त’ चित्रपट मिळाला होता. पण या चित्रपटात सुनील शेट्टी काम करत होत्या. तरीही सोमी अली काहीही बोलली नाही. कारण तिला तिचे करिअर वाचवायचे होते.

सुनील शेट्टीने मात्र चित्रपटाला नकार दिला. कारण त्यांना सोमी अलीसोबत काम करायचे नव्हते. निर्मात्यांना काही कळत नव्हते. निर्मात्यांना या चित्रपटात सुनील शेट्टीचं मुख्य भुमिकेत हवे होते. त्यामूळे त्यांनी वाट बघितली.शेवटी सुनील शेट्टीने निर्मात्यांना सोमी अलीसोबत झालेल्या वादाबदल सांगितले. त्यावेळी निर्मात्यांनी सोमी अलीला सुनील शेट्टीचा राग कमी करण्यास सांगितले. म्हणून तिने सुनील शेट्टीची माफी मागितली. पण त्यांनी माफ केले नाही.

म्हणून सोमी अलीने सलमान खानची मदत घेतली. सलमान खानला पुर्ण किस्सा सांगितला. सलमान खानला सुनील शेट्टीचा स्वभाव माहीती होता. त्या दोघांची चांगली मैत्री होती. त्यासोबतच गर्लफ्रेंडच्या करिअरची चिंता देखील होती.सलमान खानने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी सुनील शेट्टीची स्वतः हात जोडून माफी मागितली. आपल्या प्रेमासाठी सलमान आपली माफी मागत आहे. ही गोष्ट सुनील शेट्टीला आवडली आणि ते भावूक झाले. त्यांनी सोमी अलीला माफ केले आणि चित्रपटाची शुटिंग सुरू केली.

चित्रपट हिट झाला. पण सोमी अली मात्र फ्लॉप झाली. सलमान खानसुध्दा तिचे करिअर वाचवू शकला नाही. सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी खुप काही केले. चुक नसताना हात जोडून माफी मागितली. पण तरीही तो अजूनही एकटा आहे. म्हणून तो लग्नाचा विचार करत नाही’.

महत्वाच्या बातम्या

अर्नब अटक! अन्वय नाईकला आता तरी न्याय मिळणार का ?
कोरोना लढ्यात भारतीय शास्रज्ञांची मोठी कामगिरी; लागला महत्वाचा शोध
धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्माला भारतीय संघातून वगळण्याचे कारण समोर आलेच; वाचा..
शेवटी सचिन म्हणाला तेच झालं! ऋतुराजबद्दलचं भाकीत ठरलं खरं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.