सोमी अलीने एवढ्या वर्षांनंतर सांगितले तिच्या आणि सलमान खानच्या ब्रेकअपचे खरे कारण

बॉलीवूडचा सुलतान सलमान खानच्या अनेक प्रेम कहाण्या खुप प्रसिद्ध आहेत. आत्तापर्यंत सलमानचे मन अनेक अभिनेत्रींवर आले आहे. पण त्याचे कोणतेही नाते शेवटपर्यंत टिकू शकले नाही. आजही तो एकटा आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपचे कारण सर्वांना माहितीच आहे.

पण आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि सोमी अलीच्या ब्रेकअपबद्दल सांगणार आहोत. दोघांच्या ब्रेकअपने अनेकांना धक्का बसला होता. पण ब्रेकअपचे खरे कारण कोणालाही माहिती नव्हते. आज आम्ही तुम्हाला खरे कारण सांगणार आहोत.

१९९१ मध्ये सलमान खान आणि सोमी अलीच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. त्यावेळी दोघेही बॉलीवूडमध्ये नवीन होते. दोघांचे रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर खुप कमी वेळात लोकांना त्याबद्दल माहिती झाली होती.

१६ वर्षांची सोमी सलमान खानच्या प्रेमात पागल झाली होती. सोमी मूळची पाकिस्तानी होती. तिने सलमानचे पाहिले होते आणि त्याच्या प्रेमात पडली होती. सलमानसोबत लग्न करायचे म्हणून सोमी भारतात आली होती.

भारतात आल्यानंतर खुप कमी वेळात तिची आणि सलमानची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. सगळीकडे दोघांच्या नावाचे चर्चे सुरू होते. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले आणि सोमी भारत सोडून गेली.

त्यावेळी दोघांच्या ब्रेकअपचे कारण कोणालाही माहिती नव्हते. पण एवढ्या वर्षांनी सोमीने एका मुलाखतीमध्ये तिच्या सलमानच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की, सलमानने मला धोका दिला होता म्हणून मी ब्रेकअप केले आणि भारत सोडून आले.

सोमीने सांगितले की, माझे ब्रेकअप झाल्यानंतर मी तिथे राहून काय करणार. म्हणून मी भारत सोडला. मी सलमानसोबत संपर्कात नाही. पण आम्ही भेटत असतो. भेटल्यानंतर आम्ही चांगले बोलतो. तो माझा चांगला मित्र आहे.

असे बोलले जाते की, हम दिल दे चुके चित्रपटाच्या सेटवर सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. म्हणून तो सोमीला धोका देत होता. हे सोमीला समजल्यानंतर तिने ब्रेकअप केले आणि ती भारत सोडून गेली.

महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाचे नाव काढल्यानंतर आलिया भट्टला बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी देतात महेश भट्ट

ज्या अभिनेत्याला ओळखत नाही म्हणून हाकलून दिले होते; पुढे जाऊन त्यानेच राजेश खन्नाचे स्टारडम हिसकावून घेतले

जुही चावलाने स्वतःच्याच हाताने केले होते स्वतःचे नुकसान; करिश्मा कपूरला बनवले स्टार

चहलची बायको धनश्रीने ‘गब्बर’सोबत केला भांगडा; म्हणाली, याला म्हणतात एनर्जी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.