सलमान खानचा बेस्ट फ्रेंड संजय दत्तने दिला होता त्याला सर्वात मोठा धोका

बॉलीवूडमध्ये नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी इथे जागा बनवणे सोपे नाही. त्यामूळे अनेक कलाकेर फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसऱ्या मोठ्या कलाकारांची मदत घेतात. असे अनेक अभिनेते आहेत. जे बॉलीवूडमध्ये नवीन येणारिव कलाकारांना मदत करतात.

या यादीत सर्वात पहीले नाव येते ते म्हणजे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान. सलमान खानने आजपर्यंत अनेक नवीन चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च केले आहे. ज्यांचे करिअर फ्लॉप झाले आहे. त्यांचे करिअर सुधारण्यात सलमान खान मदत करतो.

त्यामूळे त्याला बॉलीवूडमधला सर्वात जास्त मदत करणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. बॉलीवूडमध्ये येणाऱ्या नवीन अभिनेत्यांसाठी सलमान खान गॉडफादर आहे. सलमान आज नवीन कलाकारांची मदत करतो.

यामागेही एक कारण आहे. जाणून घेऊया ते कारण नेमके काय आहे. सलमानच्या आयूष्यात असे काय झाले ज्यामूळे त्याने इंडस्ट्रतील नवीन कलाकारांना मदत करायला सुरुवात केली.

ही गोष्ट आहे ९० च्या दशकातील. सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामूळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा ‘पत्थर के फुल’ चित्रपट हिट झाला होता.

पण त्यानंतर सलमानचे सहा चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामूळे त्याला एका हिट चित्रपटाची गरज होती. पत्थर के फुल चित्रपटाच्या शुटींग वेळी सलमानची मैत्री संजय गुप्तासोबत झाली होती. संजय गुप्ता या चित्रपटाच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते.

त्यांना भविष्यात दिग्दर्शक व्हायचे होते. त्यामूळे त्यांनी त्याची तयारी सुरु केली होती. संजय गुप्ता आणि सलमानमध्ये खुप चांगल मैत्री झाली होती. हे दोघे एकत्र टाईम घालवत होते. अनेकदा या दोघांना एकत्र पाहीले जाऊ लागले होते.

त्यासोबतच संजय गुप्ता अनेक वेळा सलमानच्या घरी जायचे. त्यावेळेस ते एका चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते. त्यासाठी ते सलीम खानची मदत घेत होते. चित्रपटाची स्क्रिप्ट पुर्ण झाल्यानंतर संजय गुप्ताने आतिश चित्रपटाची घोषणा केली.

त्यावेळी सलमान खानला वाटले की, संजय गुप्ता माझा खुप चांगला मित्र आहे. तो या चित्रपटात मलाच घेईल. कारण त्यावेळी सलमानला एका चांगल्या चित्रपटाची गरज होती. त्याचे करिअर फ्लॉप झाले होते.

त्यामूळे त्याला वाटले की, संजय गुप्ता त्याचा मित्र आहे. तो सलमानचे करिअर नीट करण्यासाठी मदत करेल. सलमानच्या घरच्यांना देखील वाटले होते की, संजय गुप्ता सलमानची मदत करते. पण ज्यावेळी संजय गुप्ताने त्याच्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याचे नाव सांगितले.

त्यावेळी सर्वांना धक्का बसला. कारण संजय गुप्ताने त्याच्या चित्रपटामध्ये संजय दत्तला मुख्य अभिनेता म्हणून घेतले होते. हा सर्वांसाठी धक्काच होता.
सलमान खानला या गोष्टीचा राग आला होता. पण त्याने ती गोष्ट बोलून दाखवली नाही. तो तेव्हा गप्प राहीला.

कारण संजय दत्त देखील सलमान खानचा चांगला मित्र होता. त्यामूळे तो शांत होता. पण त्यावेळी बॉलीवूडमध्ये असे बोलले जाऊ लागले होते की, सलमानच्या बेस्ट फ्रेंडने सलमानला धोका दिला.

सलमान एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, ‘मला माझ्या अडचणींच्या दिवसांमध्ये कोणी मदत केली नाही. त्यावेळी मी ठरवले होते की, बॉलीवूडमध्ये नवीन येणाऱ्या अभिनेत्यांना त्यांचे करिअर बनवण्यासाठी मी मदत करीन. आज मी ते काम करत आहे’.

हे सर्वात मोठे कारण आहे. ज्यामूळे सलमान सगळ्या नवीन चेहऱ्यांवर मेहरबान होतो. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी तो त्यांना चित्रपटांच्या ऑफर देत असतो. सलमानने आजपर्यंत अनेक अभिनेत्रींना लाँच केले आहे. हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

संजय दत्तमूळे बॉलीवूडला मिळाला होता सदाशिव अमरापूरकरसारखा खलनायक

सैफ अली खानला स्टार बनवण्यात आमिर खानचा हात आहे

त्या दिवशी सलमान खानने सर्वांसमोर सुभाष घईच्या कानाखाली वाजवली होती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.