सलमान खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. सलमान खानची या इंडस्ट्रीमध्ये अनेकांशी मैत्री आहे. रवीना टंडन ही त्याची खुप चांगली मैत्रीण आहे. ‘पत्थर के फुल’ हा या दोघांचा पहीला एकत्र चित्रपट आहे. त्यानंतर रवीना टंडन आणि सलमान खान या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
त्यामूळेच त्यांची मैत्री देखील तेवढीच चांगलीच आहे.
अनंत बालानी यांनी ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे निर्माते जे.पी. सिप्पी होते. हा चित्रपट सलीम खान यांनी लिहिला होता.
या सिनेमातूनच रवीनाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. १९९१ मध्ये पत्थर फूल हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटा वेळी रवीनाचे वय १७ वर्ष होते. या चित्रपटासाठी रवीना टंडनला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटामूळे रवीना टंडन रातोरात सुपरस्टार झाली होती. चित्रपटाच्या शुटिंग वेळी अनेक गोष्टी घडत होत्या. सेटवर रवीना आणि सलमान यांच्यात चांगलेच जमायचे.
पण मैत्रीमध्ये भांडण हे होतच असतात. सलमान खान आणि रवीना टंडन यांची देखील अशीच भांडण झाली आहेत. पण हे भांडण मजेशीर आहेत. पत्थर के फुल या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती.
सलमान खान रवीनीला खूप त्रास देत असे. एक वेळी तर त्याने रवीनाच्या नाकात चॉकलेट घातले होते.
रवीना त्यावेळी सलमानवर खुप चिडली होती. या दोघांचे खुप मोठे भांडण देखील झाले होते. रवीनाला या खोडीचा राग आला होता. ती अनेक दिवस सलमानसोबत बोलत नव्हती.
परंतु या घटनेचा त्यांच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही. रवीनाने एका मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितली आहे. तसेच ती म्हणाली की, ‘सलमान एक खुप चांगला माणूस आहे. जो नेहमी गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी असतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
मराठी फिल्म इंडस्ट्रीतले हास्य सम्राट अशोक सराफ यांना मामा कोणी बनवले ?
बॅक स्टेजला लाईटचे काम करणारा ‘हा’ अभिनेता आज आहे टेलिव्हिजनवरील स्टार
‘अग्ग बाई सासूबाई’ मालिकेतील बबड्याच्या आजोबांचे निधन
तारक मेहता मालिकेतील कलाकाराची आत्मह.त्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य बाहेर