रणबीर कपूरसाठी कतरिनाने फक्त एक मेसेज करुन सलमान खानसोबत केले ब्रेकअप

बॉलीवूडचा दबंग सलमान खानच्या लव्ह स्टोरीचे किस्से कोणापासूनही लपलेले नाहीत. एकदा नाही तर अनेकदा सलमानला प्रेमात धोका मिळाला आहे. असे बोलले जाते की, सलमानच्या रागीट स्वभावामूळे त्याचे कोणतेही रिलेशनशिप टिकत नाही. त्यामूळे एकदा सोडून अनेक वेळा त्याला ब्रेकअपचे दुख सहन करावे लागले.

संगीता बिजलानीपासून ऐश्वर्यापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे अफेअर होते. भारतासोबतच भारताबाहेरील ब्यूटी कतरिना कॅफसोबत देखील सलमानचे अनेक दिवस अफेअर होते. पण हे नातं देखील जास्त टिकू शकले. नेहमी सलमानमूळे ब्रेकअप व्हायचे. पण यावेळेस मात्र त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सोडले होते. जाणून घेऊया दोघांची लव्ह स्टोरी.

२००३ मध्ये ‘बुम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी कतरिना अनेक दिवस स्ट्रगल करत होती. पण तिला इंडस्ट्रीमध्ये यश मिळत नव्हते. हिंदीसोबतच तिने साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण तिकडेही कतरिनाला यश मिळाले नाही.

याच कालावधीमध्ये कतरिनाची भेट सलमानची बहीण अलविरासोबत झाली. अलविराच्या मदतीने कतरिनाने सलमान खानच्या आयूष्यात एन्ट्री केली होती. त्यावेळी सलमान ‘मैंने प्यार क्यूं किया’ चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होता. त्याला एका नवीन चेहऱ्याची गरज होती.

ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यामूळे सलमान त्या दुखात होता. अशा काळात त्याला विदेशी ब्यूटी कतरिनाची साथ मिळाली. सलमान कतरिना चित्रपटासोबतच स्वत च्या मनात देखील जागा दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच हिट ठरला होता. त्यामूळे दोघांची जोडी चांगलीच जमली.

चित्रपटाच्या यशाच्या सलमान आणि कतरिनाचे प्रेम खुप जास्त वाढले होते. अनेकदा दोघांना पार्टीमध्ये एकत्र पाहीले जाऊ लागले. सलमान कतरिनासोबत बाहेर फिरताना दिसू लागला. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी बॉलीवूडमध्ये आग लावली होती.

सलमान कतरिनाला तिचे करिअर बनवायला मदत केली. तिला अनेक चित्रपट सलमानमूळे मिळू लागले. कतरिना करिअरमध्ये यशस्वी होऊ लागली होती. त्यामूळे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यांच्या लग्नाच्या बातम्या आगीप्रमाणे पसरत होत्या.

ज्यावेळी सलमान कतरिनाला मिसेस खान बनवण्याची तयारी करत होता. त्याचवेळी कतरिना मिसेस कपूर बनण्याची स्वप्न बघत होती. २००८ मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ चित्रपटाच्या सेटवर कतरिना आणि रणबीरची भेट झाली. दोघांच्या भेटी वाढू लागल्या आणि दोघे प्रेमात पडले.

कतरिनाला रणबीरमध्ये खरे प्रेम दिसले. रणबीर कपूरसाठी तिने सलमानला सोडण्याचा निर्णय घेतला. पण ही गोष्ट करणे सोपे नव्हते. सलमानला सोडणे कतरिनासाठी खुप आवघड होते. कारण तिला सलमानच्या रागाबद्दल माहीती होते. पण तरीही तिने हा निर्णय घेतला.

कतरिनाला लवकरात लवकर सलमानसोबत ब्रेकअप करायचे होते. त्यावेळी ती उँटीमध्ये शुटींग करत होती. सलमानसोबत ब्रेकअप करण्यासाठी तिने त्याला एक खास मेसेज केला होता. जो मेसेज वाचल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. पण काहीही करता येत नव्हते.

पहील्यांदा असे झाले होते की, कोणत्या मुलीने सलमानसोबत ब्रेकअप केले आणि ते पण एक मेसेज करुन. ब्रेकअपनंतर सलमान चागंलाच दुखी झाला होता. त्याला काहीही कळत नव्हते. काही दिवसांनी त्याच्या आयूष्यात आणखी एका मुलीची एन्ट्री झाली. पण तरीही सलमान कतरिना कधीच विसरु शकला नाही.

महत्वाच्या बातम्या –
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..
अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, कारण आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या…
आई वडीलांच्या घटस्फोटाने आनंदी होती ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, बर झालं वेगळे झाले
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; मुंबईतच आहेत दोन आलिशान बंगले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.