‘सलमान खान आणि करण जोहर हे सुशांतला सिनेमे मिळवू देत नव्हते’

 

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.  मात्र सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

आता सुशांतच्या या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला आहे. आता सुशांतचे प्रकरण खूप गुंतागुंतीचे झाले असून, सुशांतच्या या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे.

आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला असून हा खुलासा सुशांतचा जिम पार्टनर सुनील शुक्लाने केला आहे. यावेळी त्याने अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

सलमान खानने करण जोहरच्या मदतीने सुशांतला मिळणारे अनेक चित्रपट बंद केले. त्यासोबतच सलमानने सुशांतचा ‘ड्राइव्ह’ हा चित्रपट जाणीव पूर्वक बंद करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप सुनीलने केला आहे. त्याने एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती, त्यावेळी तो बोलत होतो.

तसेच आयफा अवॉर्डसाठी सुशांत जेव्हा शाहरुख खान आणि शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार होता, त्यावेळीही शाहरुख आणि शाहिदने त्याचा अपमान केला होता. त्यावेळी सुशांत आतून पूर्ण तुटला होता, असाही खुलासा सुनीलने केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.