सलमान खानने वाचवला होता दिया मिर्झाच्या आईचा जीव; ट्विट करत दियाने मानले आभार

सलमान खान आपल्या चित्रपटांसोबतच त्याच्या स्वभावामूळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याला फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात दिल खुश अभिनेत्यामध्ये गणले जाते. सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या मदतीला धावून जात असतो.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानने अभिनेत्री राखी सावंतच्या आईची देखील मदत केली होती. राखीची आई कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत आहे. त्यामुळे सलमान त्यांची मदत करताना कोणताही विचार न करता मदत केली आहे.

फक्त राखी सावंतच नाही तर अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईची देखील सलमानने मदत केली होती. दियाने स्वतः ट्विट करत या गोष्टीची माहिती दिली होती. दियाने २०१५ मध्ये याबद्दल ट्विट केले होते. त्यामुळे या गोष्टीबद्दल लोकांना समजले होते.

दियाची आई अचानक बेशुद्ध पडली होती. आईची अवस्था बघून घाबरलेल्या दियाने सलमानला फोन केला आणि बोलावून घेतले. सलमान सगळी काम सोडून दियाच्या घरी गेला आणि तिच्या आईला घेऊन दोघे हॉस्पिटलमध्ये गेले.

हॉस्पिटलमध्ये लगेच उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, पंधरा मिनिटे जरी उशिरा झाला तरी देखील त्यांच्या जीवाला धोका होता. हे ऐकल्यानंतर दियाने सलमानचे आभार मानले. कारण तो वेळेवर आला आणि त्याने दियाची मदत केली.

त्यामुळे दियाने सलमानचे आभार मानले होते. तिने ट्विट केले होते की, ‘हा तोच व्यक्ती आहे ज्याने माझ्या आईचा जीव वाचवला होता. त्यामुळे मी त्याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मी आयुष्यभर त्याची आभारी राहील. धन्यवाद सलमान माझी एवढी मदत केल्याबद्दल’.

एवढेच नाही तर दियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ज्यावेळी ती आईच्या तब्येतीमूळे चिंतीत होती. त्यावेळी सलमानने तिला आधार दिला होता. सलमानचे हे आभार मी आयुष्यभर विसरणार नाही. तो खरचं चांगला अभिनेता आहे आणि त्यापेक्षाही चांगला माणूस आहे.

सध्या सलमान त्याच्या राधे चित्रपटात व्यस्त आहे. तर दिया मिर्झा तिच्या गरोदरपणामूळे चर्चेत आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच दियाने आई होणार असल्याची गुड न्युज दिली होती. ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आपल्या सासरच्या माणसांसोबत ऐश्वर्या रायचे आहेत ‘असे’ संबंध; ननंद श्वेतासोबत असे बॉण्ड करते शेअर

प्राजक्ता माळीच्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा फोटो

अभिषेक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले? अभिषेक म्हणतो..

दया भाभीने सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा; म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.