Share

सलमान आणि कतरिनाचे सेटवरील खाजगी फोटो झाले लीक, सोशल मिडीयावर चर्चांना उधाण

Salman-Khan-Katrina-Kaif.

नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल(Viki Kaushal) यांचे लग्न झाले. अभिनेता विकी कौशलसोबत लग्न होण्याआधी अभिनेत्री कतरिना कैफचे नाव सलमान खानशी जोडण्यात आले होते. सध्या अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ ची शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे.(salman and katrina photo leak on tiger3 film set)

‘टायगर 3’ चित्रपटाच्या सेटवरून या दोन स्टार्सचे फोटो लीक झाले आहेत. या फोटोमध्ये ते दोघे एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर जखम झाल्याचं दिसून येत आहे. सध्या अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेला हा फोटो ‘टायगर 3’ चित्रपटाच्या सेटवरील आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सलमान खान स्टंट करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये कतरिना कॉम्बॅट व्हेस्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे, तर सलमान खान टी-शर्टसह ट्राउझरमध्ये दिसत आहे. या दोघांना पाहून या चित्रपटातही प्रेक्षकांना दमदार अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

https://twitter.com/iBeingAli_Pasha/status/1494189679440064512?s=20&t=hW2coT2sWpJwra2qvjscCA

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात ‘टायगर 3’ या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कंमेंटचा वर्षाव होत आहे. अभिनेता सलमान खानचा ‘टायगर 3’ सिनेमा त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

‘टायगर 3’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष शर्मा यांच्या खांद्यावर आहे. अभिनेत्री कतरिना कैफने दिल्लीला पोहोचताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी शेअर केला. अभिनेत्री कतरिना कैफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विंटर सन.’ या फोटोमध्ये कतरिना कैफच्या लूकचे तिच्या चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘टायगर 3’ चित्रपटाचे शेवटचे आऊटडोअर शेड्यूल दिल्लीत पूर्ण होणार आहे. ज्यामध्ये जवळपास 10 ते 12 दिवस या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग तुर्की, रशिया आणि ऑस्ट्रियासह अनेक देशांमध्ये करण्यात येणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल
किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; संजय राऊतांची खोचक टीका
अखेर ठरलं! सर्वात तरुण आमदार आणि महापौरांचं होणार लग्न, वाचा कशी जुळली रेशीमगाठ

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now