Share

… अन् बूट काढून सलमानने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन, व्हिडिओ व्हायरल

कट्टर शिवसैनिक असणारे दिवंगत नेते आनंद दिघे(Aanad Dighe) यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ‘ट्रेलर लाँच’ सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.(Salmaan khan Salute the image of Chhatrapati Shivaji Maharaj)

या ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. याव्यतिरिक्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रितेश देशमुख देखील या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजर होते.

या सोहळ्यादरम्यान स्टेजवर अभिनेता सलमान खानने केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होतं आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्टेजवरील प्रतिमेला वंदन करत होते. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील त्या ठिकाणी हजर होता.

अभिनेता सलमान खानने सुरवातीला बूट घेतले होते. पण प्रतिमांना वंदन करण्यासाठी पुढे येताच त्याने आपल्या पायातील बूट काढले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला बूट काढण्यापासून थांबवले. त्याचवेळी रितेश देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी सलमान खान रितेश देशमुखच्या कानात काहीतरी बोलत होता.

त्यानंतर अभिनेता रितेश देशमुख प्रतिमांना वंदन करण्यासाठी पुढे निघून गेला. त्यावेळी अभिनेता सलमान खानने आपल्या पायातील बूट काढले आणि प्रतिमांना वंदन केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या कृतीवरून लोकांनी अभिनेता सलमान खानचे कौतुक केले आहे. अभिनेता सलमान खानच्या या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होतं आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली आहे. नुकतंच या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर असणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या आकाराच्या एक होर्डिंगवर झळकलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं”, नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नवनीत राणांचे तुरुंगातील रात्रीचे व्हिडिओ जारी करावे; भाजप नेत्याची मुंबई पोलिसांकडे मागणी
अभिनेत्री ऐश्वर्या रायचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद, रागाने लालबुंद झालेला अभिषेक बच्चन सगळ्यांसमोर भडकला

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now