सलमान खानला अभिनेता नाही तर क्रिकेटर बनवणार होते सलीम खान पण….

सलमान खान आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानचे चित्रपट हिटची गॅरंटी असतात. भाईजान सलमानचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो. त्यामूळेच सलमानला हिटची गॅरंटी बोलले जाते.

इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये सलमानचे नाव येते. गेले ३० वर्ष सलमान खान बॉलीवूडवर राज्य करत आहे. समीक्षकांना सलमानचा चित्रपट आवडला नाही तरी तो त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडतो. कोणी काहीही बोलले तरी सलमानच्या चित्रपटांवर फरक पडत नाही.

इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सलमानच्या नावानेच घाबरतात.एवढे स्टारडम सलमानने गेल्या काही वर्षांमध्ये कमवले आहे. आज इंडस्ट्रीमध्ये राज्य करणाऱ्या सलमानच्या वडीलांचे स्वप्न त्याला अभिनेता तर क्रिकेटर बनवायचे होते. सलीम खानने स्वत: एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.

सलीम खानचे स्वप्न होते की, सलमानने अभिनेता नाही तर क्रिकेटर बनावे. कारण त्यांना वाटत होते की, मोठा मुलगा सलमान बॉलीवूडमध्ये टिकू शकणार नाही. त्याला अभिनय क्षेत्र जमणार नाही. म्हणून त्यांनी सलमानला क्रिकेटर शिकवायला सुरुवात केली होती.

सलीम खानने क्रिकेटर सलीम दुर्रानीकडून सलमानला क्रिकेटची ट्रनिंग दिली होती. अनेक दिवस सलमान क्रिकेट शिकत होता. वडीलांचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो खुप मेहनत करत होता. पण त्यावेळी सलमानला क्रिकेटर बनणे खुप कठिण वाटले होते. सलमानने स्वत एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

सलमान खान म्हणाला होता की, ‘माझ्या वडीलांची इच्छा होती की, मी अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हावे. मी क्रिकेटर बनण्याची ट्रेनिंग घेत होतो. माझे कोच देखील माझ्या खेळाने कौतूक करायचे. पण एका खेळाडूप्रमाणे सकाळी लवकर उठून क्रिकेटचा सराव करणे त्याकाळी माझ्यासाठी सर्वात कठिण काम होते’.

सलमानला सकाळी उठवत नव्हते. म्हणून त्याने क्रिकेट खेळणे बंद केले आणि अभिनयाकडे वळलो. समील खान स्वत खुप चांगले क्रिकेटर होते. त्यांना सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड होती. पण ते क्रिकेटर बनू शकले नाही. याच कारणामूळे त्यांनी मोठा मुलगा सलमानला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पाहीले होते. ते स्वप्नही पुर्ण होऊ शकले नाही.

सलमान खान त्याच्या आळशी स्वभावामूळे वडीलांचे स्वप्न पुर्ण करु शकला नाही. त्याने ज्या क्षेत्रात करिअर निवडले त्या क्षेत्रात टॉप केले. सलमानचे हे यश बघून सलीन खानही खुप आनंदी होतात. मुलाचे यश त्यांच्यासाठी सर्वात पहीले येते. त्यांना दुसरे काहीही नको.

महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
आयूष्यभर भाड्याच्या घरात राहत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक; टेलरसोबत केले होते लग्न
सुपरस्टार असूनही सनी देओलसोबत काम करायला काजोलने दिला होता नकार
‘खिलाडिंयो का खिलाडी’ चित्रपटाला झाली २५ वर्ष पुर्ण; सेटवर सुरु झाली होती अक्षय आणि रेखाची प्रेम कहाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.