तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल

भारतात अनेक तरुणवर्ग नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण झाले की लगेच ते नोकरीच्या शोधतात दिसतात. आपल्या भारतात बेरोजगारीचे प्रमाण देखील भरपुर प्रमाणत आहे. अनेक असे तरुण आहेत, जे शिक्षण घेऊन घरीच बसून आहेत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे.

भारतात नोकऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षित आणि अंगात योग्य ते गुण असलेल्या तरुणांची गरज असते. जर तुमच्यात हे गुण असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला पगारही उत्तम मिळतो.

भारतात काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार मिळतो. हे क्षेत्र नक्की कोणते आहेत याबद्दल चला तर मग जाणून घेऊया. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला भारतात सर्वात मोठी मागणी आहे. अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि फेसबुक सारख्या टेक कंपन्या मोठ्या संख्येनं पदभरती करतात.

एका अनुभव नसलेल्या इंजिनिअरला साधारणतः वर्षाचा पाच ते सात लाख रुपये पगार मिळतो. तसेच कमर्शियल पायलटच्या नोकरीत पैसे तर आहेतच पण यांच्याकडे आदराने बघितले जाते. दर महिन्याकाठी यांना दीड ते दोन लाख रुपये पगार मिळतो.

डॉक्टर आणि इंजिनिअर हे देशातील दोन पारंपारिक व्यवसाय आहेत. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. म्हणून त्यांच्यासाठी बर्‍याच संधी आहेत. जरी डॉक्टर आपली प्रॅक्टिस करत असेल तरी ते दर महिन्याला लाखो रुपये कमवतात.

चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायाला कधीच मरण नाही. प्रत्येक कंपनीला सीए आवश्यक असतो. जे लोक पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल करतात त्यांना वर्षाला ११-१५ लाख रुपये पगार मिळतो. अशा प्रकारे योग्य पदवी तुम्ही घेतली, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब भेटू शकतो.

ताज्या बातम्या

..म्हणून संजय दत्तवर भयंकर चिडले होते सुनील दत्त; घर सोडून जाण्याची दिली धमकी

काय सांगता! गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा, नवरदेवाला कानशिलात लावून परतली माहेरी

सुरु झाली लगीनघाई…! अभिनेत्री सायली संजीव अडकणार लग्न बंधनात? पहा ‘हा’ मराठी अभिनेता आहे नवरदेव..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.