आयपीएलनंतर धोनी पहिल्यांदाच आला कॅमरासमोर; साक्षीने शेअर केला जीवा आणि धोनीचा खास व्हिडिओ

आयपीएल २०२१ सुरु असतानाच कोरोना शिरकाव झाल्याने आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे सर्व क्रिकेटपटूंना सुरक्षित घरी पाठवण्यात आले होते.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनाही आपल्या घरी रांचीला परतला आहे. धोनीचे फॅन्स त्याला नेहमीच पाहण्यासाठी उत्युक असतात. पण धोनी सोशल मीडियापासून लांबच असलेला दिसतो.

धोनी जरी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला तरी त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. साक्षी नेहमीच धोनीचे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असते, तसेच धोनीच्या अपडेट्स देत असते.

आता आयपीएलनंतर धोनी पहिल्यांदाच दिसून आला आहे. साक्षी सोशल मीडियावर नेहमीच व्हिडिओ शेअर करत असते, आताही तिने धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी आयपीएलनंतर पहिलांदाच दिसून आल आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जास्तीत जास्त वेळ त्याच्या रांचीच्या फार्म हाऊसवरच घालवत असतो. धोनीने शेती करुन ती बाजारपेठेत पण विकली होती. आता साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो कुत्र्यांसोबत खेळताना दिसून येत आहे. धोनीसोबत त्याची मुलगी जीवा पण आहे.

धोनीला विदेशी कुत्रे पाळण्याची खुप हौस आहे. त्याच्या घरात अनेक विदेशी कुत्रे त्याने पाळलेले आहे. धोनीकडे सॅम नावाचा बेल्जियम जातीचा कुत्रा असून त्या कुत्र्याची बाजारात किंमत तब्बल ७५ हजार रुपये इतकी आहे. तसेच लिली, गब्बर नावाचा कुत्रे असून त्यांची किंमत ६० ते ८० हजार इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: गाडी पार्क करण्यासाठी ड्रायव्हरने घेतली कुत्र्याची मदत; पहा कुत्र्याने कशी केली गाडी पार्क
भाजपने मराठ्यांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यावर तोडगा सांगावा; समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजीराजे आडवा येईल
कोरोनाग्रस्त आईला मुलगा व सून रुग्णालयात सोडून गेले; नर्सने आईसारखे सांभाळले आणि..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.