मुंबई महानगरपालिकेत काम करणारा संदेश कसा झाला टेलिव्हिजनवरील सज्जनराव? जाणून घ्या प्रवास

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने थोडयाच काळात प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. या मालिकेने टिआरपीमध्ये देखील अनेक मोठ्या मोठ्या मालिकांना मागे टाकले आहे. ही मालिका सध्या सर्वात टॉपवर आहे.

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतली प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. त्यासोबतच मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांना देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आज आपण या मालिकेत सज्जनरावांची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मालिकेत संदेश उपशामने सज्जनरावांची भुमिका निभावली आहे. या मालिकेच्या अगोदर सज्जनने अनेक नाटकं आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामूळे हा चेहरा अभिनय क्षेत्रासाठी नविन नाही. सुरुवातीला सज्जनरावांची भुमिका खुप छोटी होती. फक्त पाच दिवस या पात्राचे काम होते.

पण मालिका सुरु झाल्यानंतर सज्जनरावांच्या भुमिकेला लोकांनी खुप जास्त प्रेम दिले. ही भुमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यामूळे त्यांनी परत एकदा मालिकेच्या निर्मात्यांकडे सज्जनरावांची चौकशी करायला सुरुवात केली.

या भुमिकेची प्रसिद्ध बघून निर्मात्यांनी परत एकदा संदेशजला मालिकेत काम करायला बोलावले. संदेशची ज्यावेळी मालिकेसाठी निवड झाली त्यावेळी त्याला फक्त पाच दिवसांचे काम आहे. असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणेच संदेशने तयारी केली होती.

पण सज्जनरावांचा साधेपणा प्रेक्षकांना खुप जास्त भावला. त्यांचा अभिनय लोकांच्या मनामध्ये घर करुन गेला. त्यामूळे मालिकेत सज्जनचे काम संपल्यानंतर प्रेक्षक मालिकेच्या निर्मात्यांना या भुमिकेबद्दल विचारु लागले. प्रेक्षकांच्या या प्रश्नांची संदेशच्या अभिनयाचा विजय झाला होता.

संदेशला या गोष्टीचा आनंद होता. पण त्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीमूळे सज्जनरावांना मालिकेत परत आणण्यात आले. अभिनयासोबतच संदेश मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत आहेत. त्यांना अभिनयात खुप रुची होती.

अभिनयाची निवड जपण्यासाठी त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. संदेशने गेला उडत, करुन गेलो गाव, स्पिरिट, नकळत दिसले सारे अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दुसऱ्यांदा केले लग्न, डान्सर श्रद्धा फाटक सोबत बांधली लग्नगाठ

रणबीर कपूरच्या ‘त्या’ एका वाईट सवयीला वैतागली आहे फिल्म इंडस्ट्री; अनूष्का शर्माने केला खुलासा

आजकाल कुठे गायब आहे ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील बालकलाकार दर्शिल सफारी?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.