सैराटमधल्या लंगड्याच्या नशीबात कसली सुंदर हिरोईन आलीय बघा; फोटो पाहूनच चकीत व्हाल

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटात इतर कलाकारांप्रमाणे तानाजी गळगुंडे म्हणजे तुमचा आमचा लंगड्या प्रकाश झोतात आला. अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ या चित्रपटातून मोनालिसा बागलसोबत रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे.

तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित “भिरकीट” या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ड्राय डे, परफ्यूम, गणू, झाला बोभाटा, टोटल हुबलाक अशा चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून मोनालीसा बागल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तर तानाजीने ‘सैराट’ च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार भूमिका साकारत रसिकांची मनं जिकली होती.

सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला. कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अगडबम’ या सिनेमात तो ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसला होता.

आता भिरकीट चित्रपटातून तानाजी सोबत मोनालिसाची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरत आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हृदयद्रावक! कोरोनावर मात करुन पटकन घरी येतो, असे म्हणणारे आईबाबा घरी परतलेच नाही
पत्नीच्या नकळत पतीने बसवला घरात कॅमेरा, नंतर समोर आला ‘हा’ घाणेरडा प्रकार
मुलाच्या लग्नात बिलकूल आनंदी नव्हत्या शर्मिला टागोर; कारण ऐकून धक्का बसेल
मुलाच्या लग्नात बिलकूल आनंदी नव्हत्या शर्मिला टागोर; कारण ऐकून धक्का बसेल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.