Share

Sairat : सैराट फेम सुरज पवारची ६ तास चौकशी; पोलीस प्रिन्सच्या हातात बेड्या ठोकणार?

suraj pawar

Sairat : मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजलेला आणि सर्वांच्या परिचयाचा चित्रपट म्हणजे ‘सैराट‘. या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, आता या चित्रपटातील एका कलाकाराच्या नावाला कलंक लागलेला आहे.

सैराटमध्ये आर्चीच्या भावाची भूमिका निभावणारा प्रिन्स अर्थात सूरज पवार याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती. त्यांनतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सूरज व त्याच्या साथीदारांनी फसवणूक केली असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

याप्रकरणी सुरज पवार काल राहुरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला होता. यावेळी जवळपास सहा तास त्याची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सोमवारी पुन्हा एकदा त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

महेश वाघडकर नामक व्यक्तीने सुरज पवार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात तक्रार केली होती. नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची ही तक्रार आहे. त्यावरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे आणि ओंकार तरटे या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर काल सैराटमधील प्रिन्स म्हणजेच सुरज पवार याची चौकशी करण्यात आली आहे. त्याला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. सूरज पवारची चौकशी केल्यांनतर त्याचा या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Shinde group: केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाला लागली लाॅटरी; टिम मोदीमध्ये ‘या’ नेत्यांना संधी मिळणार
Rajasthan : लग्नानंतर सहा दिवसातच नववधूने केला ‘हा’ भयानक कांड; वाचून पायाखालची जमीन सरकेल
Supriya sule : शिंदेंच्या मदतीला जाणे शीतल म्हात्रेंना पडणार महागात; राष्ट्रवादीने दाखवला चांगलाच हिसका
snake : अंगावर काटा आणणारी कहाणी; एकाच सापाचा तरुणाला १५ दिवसांत ८ वेळा दंश

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now