Share

मोठी बातमी! ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडेला केले रुग्णालयात दाखल

‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता तानाजी गालगुंडेची प्रमुख भूमिका असलेला ‘भिरकीट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता अभिनेता तानाजी गालगुंडे(Tanaji Galgunde) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.(‘Sairat’ fame actor Tanaji Galgunde admitted to hospital)

अभिनेता तानाजी गालगुंडे सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेता तानाजी गालगुंडेला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तानाजीला सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

सोलापूरच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर अमेय ठाकूर सध्या अभिनेता तानाजी गालगुंडेवर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता तानाजी गालगुंडे यांच्यावर काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. उपचार केल्यानंतर अभिनेता तानाजी गालगुंडे लवकर बरा होईल, असे डॉक्टर अमेय ठाकूर यांनी सांगितले आहे.

अभिनेता तानाजी गालगुंडेने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे अभिनेता तानाजी गालगुंडे खूप चर्चेत आला होता. अभिनेता तानाजी गालगुंडेने ‘सैराट’ चित्रपटात ‘लंगड्या’ हे पात्र साकारलं होतं. ‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेता तानाजी गालगुंडेला खूप प्रसिद्धी मिळाली होती. ‘सैराट’ चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये देखील अभिनेता तानाजी गालगुंडेने काम केले होते.

याशिवाय अभिनेता तानाजी गालगुंडेने ‘गस्त’ आणि ‘भिरकीट’ या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका केली आहे. तसेच अभिनेता तानाजी गालगुंडेने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘झुंड’ या चित्रपटात भूमिका केली आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मराठी मालिकेत देखील अभिनेता तानाजी गालगुंडेने महत्वाची भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार मुख्यमंत्री भगवंत मान, 16 वर्षांनी लहान ‘या’ मुलीसोबत करणार लग्न
दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार मुख्यमंत्री, 16 वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी, जाणून घ्या तिच्याबद्दल..
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात ‘त्या’ नेत्यांना मिळणार डच्चू: वाचा कुणाला कोणते खाते?

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now