..म्हणून सैराटफेम अभिनेता आज अभिनय सोडून करत आहे शेती

काही चित्रपट हे खुप खास असतात. त्या चित्रपटांना रिलीज होऊन कितीही वर्षे झाली. तर ते चित्रपट आपल्याला आजही नवीन वाटतात. असाच एक चित्रपट मराठीमध्ये पण आला होता. या सिनेमाला रिलीज एवढी वर्षे झाली तरी हा सिनेमा आजही नवीन वाटतो.

हा चित्रपट आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. सैराटने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. त्यासोबतच या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर लोकांची मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे पाहण्याची नजर बदलली आहे. हा मराठीतला सर्वात हिट सिनेमा आहे.

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटात काम करणारे कलाकार रातोरात स्टार झाले होते. आर्चि, परश्या, सल्या आणि प्रदीप आजही यांचे स्टारडम तसेच कायम आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार अभिनेते नव्हते. पण त्यांचा अभिनय पाहून हे अजिबात ओळखायला येत नाही.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सर्व सामान्य मुलांना घेऊन हा चित्रपट बनवला आहे. पण अभिनय मात्र मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल असा आहे. आज आपण या चित्रपटातील एका कालाकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

हा कलाकार आहे प्रदीप म्हणजे तानाजी गळगुंडे. या चित्रपटात त्याने अतिशय उत्तम प्रकारे लंगड्याची भुमिका केली आहे. त्याचा अभिनय पाहून अनेकांना धक्का बसला होता. कारण तानाजी हा अभिनेतानसून शेतकरी आहे.

नागराज मंजुळे यांना त्यांच्या एका मित्राने तानाजीबद्दल सांगितले होते. त्यांनतर त्यांनी तानाजीचे ऑडीशन घेतले आणि त्याची या भूमिकेसाठी निवड केली. तानाजीने देखील अतिशय उत्तम प्रकारे अभिनय केला.

सैराट चित्रपट रिलीज झाल्यानंतर तानाजी रातोरात स्टार झाला. त्याला कधीच असे वाटले नव्हते की तो अभिनेता होईल. पण नागराज मंजुळेमूळे ही गोष्ट शक्य झाली. सैराट चित्रपटाला रिलीज होऊन एवढी वर्ष झाली. पण प्रेक्षकांना आजही प्रदीप निभावलेली भुमिका लक्षात आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर पासूनच प्रदीप शेती करत होता. अभिनेता झाल्यानंतर देखील त्याने शेती करणे सोडले नाही. तो आजही शेती करत आहे. शेतीमधून त्याला पैसा भेटतो. पण त्यापेक्षाही जास्त म्हणजे त्याला शेती करताना खुप आनंद होतो. त्यामुळे तो भविष्यात पण शेती करत राहणार आहे.

एवढेचं नाही तर प्रदीप कोणताही फॉर्म भरत असताना. त्या फॉर्मवर शेतकरी आणि अभिनेता असे दोन्ही लिहितो. सैराटनंतर प्रदीप सैराट चित्रपटाच्या साऊथच्या रिमेकमध्ये दिसला होता. पण त्यानंतर मात्र जास्त चित्रपटांमध्ये दिसला नाही.

त्याने टेलिव्हिजनवर ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमध्ये काम केले. त्यासोबतच कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी या कार्यक्रमांमध्ये त्याने लिखाणाचे काम देखील केले.

पण गेल्या काही दिवसात तो अभिनयापासून लांब आहे. पण त्याने शेती करणे कधीच सोडले तो आजही शेतात काम करताना दिसतो. तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. प्रदीप लवकरच अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – मिनाकुमारी बाबतच्या वक्तव्यावर तोंडावर आपटली कंगना; खोटेपणा दाखवून देत भडकले कुटुंबीय

बॉलीवूडचे ‘हे’ सात कलाकार गोत्यात! ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

अजय देवगनसाठी ‘या’ अभिनेत्रीने कापून घेतली होती हाताची नस

स्वतःचे शेत आहे पण शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? मग ‘असा’ करा शेतरस्त्यासाठी अर्ज

चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.