मी मरतीय…! सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले; अन्…

मुंबई | बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय मुलीने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सायली कल्याण पारेकर (वय १६) असे या मृत मुलीचे नाव आहे. पहाटे घरातून निघून गेलेल्या सायलीचा मृतदेह बुधवारी (ता. १८) रोजी सकाळी एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

तसेच घरातून बाहेर पडताना, सायलीने ‘मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

सायली बेपत्ता असल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता. पण, कुठेही तिचा मृतदेह आढळून आला नाही. दरम्यान विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सायलीने हे टोकाचे पाऊल का उचलले? सायलीने आत्महत्या केली की घातपात? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. अद्याप कारण समजू शकले नाही. मात्र या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
पहा सोनू सुदच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो; इंटेरियरसाठी केले आहेत लाखो रुपये खर्च
सुशांत सिंग राजपूतच नाही तर ‘या’ अभिनेत्यांचे चित्रपट देखील त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले होते
भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.