आपल्या घटस्फोटाबद्दल मुलांना सांगायला घाबरत होता सैफ अली खान; म्हणून त्याने…

८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग सध्या फिल्मी दुनियेपासून दुर आहे. पण तरीही ती नेहमीच चर्चेत असते. अमृता सध्या तिची मुलगी साराच्या करिअरवर लक्ष देत आहे. अमृताला साराला बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री बनवायचे आहे.

अमृता सिंगने १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘बेताबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. करिअरच्या सुरुवातीला अमृताचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. सनी देओल, विनोद खन्नासोबत अमृताचे अफेअर होते. त्यामूळे ती तिच्या अफेअरमूळे खुप जास्त चर्चेत असायची.

अमृताचे नाव अनेकांशी जोडले गेले होते. पण तिने सैफ अली खानशी लग्न केले. एका चित्रपटाच्या सेटवर अमृता आणि सैफची पहीली भेट झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये अमृता आणि सैफने लग्न केले.

लग्नानंतर सैफ आणि अमृताला सारा आणि ईब्राहिम ही दोन मुलं झाली. पण दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. २००४ मध्ये अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने मुलांची जबाबदारी घेतली. ती मुलांच्या संगोपनामध्ये व्यस्त झाली.

सैफने दुसरे लग्न केले आहे आणि तो चौथ्यांदा वडील होणार आहे. सैफचे अमृतावर खुप प्रेम होते. आपल्या घटस्फोटाविषयी बोलताना सैफने मोठा खुलासा केला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटोशी संबिधित गोष्टींचा खुलासा केला आहे.

सैफ म्हणाला होता की, ‘प्रेम हे न सांगता होते. पण जर तुम्ही प्रेमात अयशस्वी झालात. तर मग वेगळं होणे तुमच्यासाठी योग्य आहे. मी देखील तेच केले. घटस्फोट घेणे हा माझा आणि अमृताचा निर्णय होता. या निर्णयात तिसऱ्या कोणत्याही व्यक्तिचा समावेश नव्हता’.

सैफला घटस्फोट घेणे कठिण होते का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, ‘घटस्फोट घेणे कठिण नव्हते. पण आमच्या मुलांना घटस्फोटाबद्दल सांगने कठिण होते. आमची मुलं लहान होती. त्यामूळे त्यांना ही गोष्ट सांगणे आमच्यासाठी कठिण होते. मुलांना आमच्या निर्णयाबद्दल सांगणे आम्हा दोघांसाठी अवघड होते’.

सैफने पुढे सांगितले की, ‘त्याच्या आयूष्यात आलेल्या सर्वात कठिण परिस्थितीमध्ये या गोष्टीचा समावेश होतो. या गोष्टीची आठवण आल्यानंतर मी आजही घाबरतो. आज मी माझ्या आयूष्यात आनंदी आहे. मी माझ्या मुलांसोबत चांगला टाईम घालवतो’.

महत्वाच्या बातम्या –

शमिता शेट्टीच्या ‘या’ एका चुकीमूळे तिचे करिअर झाले होते फ्लॉप; आज करते पश्चाताप

आईला घाबरुन प्रियंकाने तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवले होते; आईला समजल्यावर केली होती धुलाई

पुजा हेगडेकडे चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी; तिने कसलाही विचार न करता शेअर केला ‘तो’ फोटो

एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही टिना आणि अनिल अंबानीची लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.